Join us  

IND vs AUS 3rd Test, Umesh Yadav: व्वा, उमेश भाऊ... मानलं...!! फक्त १७ धावा तरीही मोडला 'सिक्सर किंग' Yuvraj Singh चा रेकॉर्ड, Virat Kohli शी केली बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 7:08 PM

Open in App
1 / 6

IND vs AUS 3rd Test, Umesh Yadav breaks Yuvraj Singh Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका जरी भारताच्या पारड्यात दिसत असली तरी तिसऱ्या सामन्यात चित्र काही वेगळंच दिसले. दोन सामने गमावल्यानंतर आज तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने तुफानी कमबॅक केला.

2 / 6

स्पिनला मदत करणाऱ्या पिचवर भारतीय संघ आपल्याच जाळ्यात अडकला. ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुन्हेमनचे ५ बळी आणि नॅथन लायनचे ३ बळी यांच्या बळावर पाहुण्यांनी भारताचा डाव १०९ धावांत गुंडाळला.

3 / 6

एकेवेळी भारत शंभरी गाठेल की नाही अशी भीती भारतीय चाहत्यांना होती. पण उमेश यादवने सामन्यात धमाल आणली. त्याने दोन तडाखेबाज षटकार मारून चाहत्यांचे मनोरंजन केले. इतकेच नव्हे तर केवळ १७ धावांच्या खेळीच्या जोरावर उमेश यादवने युवराज सिंग आणि रवी शास्त्री दोघांचाही विक्रम मोडला.

4 / 6

उमेश यादवने फॅन्सचे मनोरंजन करत सामन्यात रंगत आणली. उमेश यादवने नॅथन लायनचा चांगलाच समाचार घेतला. त्याने लायनच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार खेचला. त्याच्या षटकारामुळे विराट कोहली भलताच खुश झालेला दिसला.

5 / 6

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर उमेश यादवने आणखी एक धडाकेबाज षटकार मारला. नॅथन लायनसारख्या अतिशय प्रतिभावान आणि अनुभवी स्पिन गोलंदाजाला सलग दोन षटकार मारत उमेश यादवने 'हम किसी से कम नहीं' हे दाखवून दिले.

6 / 6

उमेश यादवने १३ चेंडूत २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १७ धावा केल्या. त्यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत त्याने युवराज सिंग आणि रवी शास्त्रींचा विक्रम मोडला. या दोघांच्या नावे २२ षटकार आहेत, पण उमेशचे कसोटीत आता २४ षटकार झाले आहेत. त्यामुळे त्याने विराटच्या कसोटीतील षटकारांशी बरोबरी केली.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियायुवराज सिंगआॅस्ट्रेलियाविराट कोहली
Open in App