कसोटीमध्ये शतक नाही हे सतत डोक्यात यायचे - विराट
मुलाखतीदरम्यान, राहुल द्रविड यांनी विराटचे कौतुक केले पण दीर्घकाळ कसोटी शतक न झळकावल्यामुळे या गोष्टी मनात घुमत राहिल्या का, असा प्रश्नही केला. यावर कोहली म्हणाला, "कुठेतरी शतक न केल्याने तुम्हाला फलंदाज म्हणून आणखी काही करण्याची प्रेरणा मिळते. काही प्रमाणात, मी या गोष्टींना माझ्यावर वर्चस्व गाजवू दिले. पण मला संघासाठी धावा करायच्या आहेत. मला माहित आहे की 40-45 धावांनंतर मी 150 धावा करण्याकडे पाहतो, जेणेकरून मी माझ्या संघासाठी शक्य तितके योगदान देऊ शकेन.