Join us  

IND vs AUS Test : भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 'सिक्रेट प्लान'! जम्मू-काश्मीरवरून मागवली मदत, कोण आहे अबीद मुश्ताक?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 5:29 PM

Open in App
1 / 6

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून भारताला सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्पर्धेची फायनल खेळता येणार आहे. पण, भारताला रोखण्यासाठी पाहुण्यांनीही कंबर कसली आहे आणि त्यासाठी त्यांनी जम्मू-काश्मीरवरून खास माणूस बोलावला आहे.

2 / 6

ऑस्ट्रेलियन संघाला २००४-०५ नंतर भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. २००५ नंतर ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळपट्टींवर सलग तीन कसोटी मालिका गमावल्या आहेत आणि यंदा ही मालिका खंडित करण्याचा त्यांचा निर्धार आहे. Border-Gavaskar Trophy ची पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होणार आहे.

3 / 6

भारतात होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी फिरकीपटूंना साथ देणारी खेळपट्टी असेल, याची जाण ऑस्ट्रेलियाला आहे. त्यामुळेच त्यांनीही संघात फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे. पण, त्याचसोबत त्यांनी भारताच्या अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांचा सामना करण्यासाठी एक सिक्रेट प्लानही आखला आहे.

4 / 6

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या बंगळुरू येथील कॅम्पसाठी जम्मू-काश्मीरचा मिस्ट्री फिरकीपटू अबीद मुश्ताक याला बोलावले आहे. त्याच्या गोलंदाजीवर ऑसी फलंदाजांचा सराव सुरू झाला आहे. अक्षर पटेलने घरच्या मैदानावर ६ कसोटीत ३९ विकेट्स घेतल्या आहेत आणि ही गोष्ट ऑस्ट्रेलियाला सतावतेय. शिवाय जडेजाही तंदुरुस्त होऊन फॉर्मात परतला आहे.

5 / 6

त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने मुश्ताकला बोलावले आहे. २६ वर्षीय गोलंदाजाने रणजी करंडक स्पर्धेतील ७ सामन्यांत ३२ विकेट्स घेतल्या आहेत. विदर्भविरुद्धच्या सामन्यात त्याने १८ धावांत ८ विकेट्स घेत सर्वांना अचंबित केले होते. ''मुश्ताकला सर्वोत्तम फलंदाजांकडून शिकण्याची ही संधी आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट आहे,''असे काश्मीर स्पोर्ट्स मध्ये सूत्रांनी म्हटले आहे.

6 / 6

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजम्मू-काश्मीररणजी करंडक
Open in App