लोकेशने ३३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १९), हार्दिक पांड्या (२) व दिनेश कार्तिक (२०) अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५० धावा केल्या. भारताने ७ बाद १८६ धावा केल्या. केन रिचर्डसनने चार विकेट्स घेतल्या. यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. मिचेल मार्श ( ३५) व अॅरोन फिंच यांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा चोपल्या. स्टीव्हन स्मिथ ( ११) , ग्लेन मॅक्सवेल ( २३), मार्कस स्टॉयनिस ( ७) हे झटपट बाद झाले.