Join us  

India vs Australia, 4th Test : MS Dhoniनंतर टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरनं केला विक्रम, शार्दूल ठाकूरसह सावरला डाव

By स्वदेश घाणेकर | Published: January 17, 2021 10:06 AM

Open in App
1 / 10

India vs Australia, 4th Test Day 3 : भारतीय संघानं तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर गाडी रुळावर येईल असे वाटत होते. पण, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चतूर खेळ करताना चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांना माघारी पाठवले

2 / 10

मयांक अग्रवाल ( Mayank Agarawal) पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. त्यात रिषभ पंतही ( Rishabh Pant) विचित्र फटका मारून माघारी परतल्यानं टीम इंडिया संकटात सापडली. पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला.

3 / 10

दुसऱ्या दिवसाची जवळपास ३५ षटकं पावसामुळे वाया गेल्यानं २ बाद ६२ धावांवर खेळ थांबवावा लागला होता. तिसऱ्या दिवसावरही पावसाचं सावट आहे, परंतु पहिल्या सत्रात त्याने त्रास दिलेला नाही.

4 / 10

पुजारा व अजिंक्य यांनी संयमी सुरुवात करताना ४५ धावा जोडल्या आणि संघाच्या फलकावर १०५ धावा असताना टीम इंडियाला तिसऱ्या दिवसाचा पहिला धक्का बसला. चेतेश्वर पुजारा ९४ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीनं २५ धावा करून जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. तत्पूर्वी अजिंक्यला मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर दोन जीवदान मिळाले.

5 / 10

स्टार्कनं टाकलेला चेंडू अजिंक्यच्या बॅटला एज लागून गल्लीच्या दिशेनं गेला, सुदैवानं तेथे फिल्डर नसल्यानं त्याला चौकार मिळाले. पण, ५५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. मॅथ्यू वेडनं कॅच घेत अजिंक्यला माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्य ९३ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीनं ३७ धावांवर माघारी परतला. लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात मयांक ( ३८) जोश हेझलवूडनं माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला.

6 / 10

तिसऱ्या कसोटीतील नायक रिषभ पंत आक्रमक अंदाजात दिसला, परंतु हेझलवूडनं रणनीती आखून त्याला बाद केले. हेझलवूडनं पंतच्या शरिरावर चेंडूंचा मारा केला आणि त्यापैकी एका चेंडूवर पंतला विचित्र फटका मारणे भाग पडले. गल्लीमध्ये उभ्या असलेल्या कॅमेरून ग्रीननं झेल घेत पंतला ( २३) माघारी जाण्यास भाग पाडले.

7 / 10

फलकावर १८६ धावा असताना रिषभ माघारी परतला. भारत १८३ धावांनी पिछाडीवर होता आणि ऑस्ट्रेलिया शेपूट झटपट गुंडाळेल असेच वाटत होते.

8 / 10

पण, वॉशिंग्दन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी ऑसींना धक्का दिला. दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या डावातील ही पहिलीच अर्धशतकी भागीदारी ठरली.

9 / 10

सुंदरनं वैयक्तिक ३० धावांचा टप्पा ओलांडताच महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. पदार्पणात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो सातवा भारतीय खेळाडू ठरला. पण, महेंद्रसिंग धोनी ( ३० धावा वि. श्रीलंका) याच्यानंतरचा पहिलाच फलंदाज ठरला.

10 / 10

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावॉशिंग्टन सुंदरशार्दुल ठाकूरमहेंद्रसिंग धोनी