Join us  

BGT Record : सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत 'ओल्ड इज गोल्ड सीन'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 8:12 PM

Open in App
1 / 9

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. भारतीय संघासमोर या दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत टिकून राहण्याचं आव्हान आहे.

2 / 9

मॉडर्न कसोटी क्रिकेटच्या जमान्यात अनेक खेळाडू मोठी फटकेबाजी करताना पाहायला मिळते. षटकार चौकारांची डील होते. पण तुम्हाला पटणार नाही की, बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप ५ च्या यादीत 'ओल्ड इज गोल्ड' सीन दिसून येतो.

3 / 9

भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा सोडला तर BGT स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जुन्या मंडळींचा दबदबा दिसून येतो.

4 / 9

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील सिक्सर किंग आहे. त्याने ३४ कसोटी सामन्यात २५ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले आहे.

5 / 9

ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यात रंगणाऱ्या कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मॅथ्यू हेडन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १८ कसोटी सामन्यात २४ षटकार मारले आहेत.

6 / 9

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीही या यादीत आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये आहे. २९ कसोटी सामन्यात धोनीच्या भात्यातून १६ षटकार पाहायला मिळाले आहेत.

7 / 9

हिटमॅन रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ११ कसोटी सामन्यात त्याच्या खात्यात १५ षटकारांची नोंद आहे.

8 / 9

ऑस्ट्रेलियन मायकेल क्लार्क या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने २२ कसोटीत १४ षटकार ठोकले आहेत.

9 / 9

बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहली २४ कसोटी सामने खेळला आहे. त्याची कामगिरी दमदार असली तरी षटकारांच्या बाबतीत त्याचा निभाव लागत नाही. त्याच्या भात्यातून फक्त ५ षटकार आले आहेत. तो ९ खेळाडूंसह या यादीत २६ व्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियासचिन तेंडुलकररोहित शर्माविराट कोहली