Join us  

'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 12:23 PM

Open in App
1 / 10

पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव करुन भारतीय संघाने विजयी सलामी दिली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या आर अश्विनचा 'सामनावीर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पहिल्या डावात भारत अडचणीत असताना त्याने शतकी खेळी केली.

2 / 10

अश्विनच्या ११३ धावांच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर बांगलादेशच्या पहिल्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली.

3 / 10

बांगलादेशचा संघ अवघ्या १४९ धावांत गारद झाल्याने भारताने विजयाच्या दिशेने कूच केली. पहिल्या डावात भारत अडचणीत असताना अश्विनने शतक तर जड्डूने शानदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमाल केली.

4 / 10

खरे तर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात अवघ्या १४९ धावा केल्याने भारताला मजबूत आघाडी मिळाली. त्यामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे विशाल लक्ष्य होते.

5 / 10

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झाला. अखेर भारताने तब्बल २८० धावा विजय साकारला. अश्विन एकाच कसोटीत शतक झळकावणारा आणि पाच बळी पूर्ण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे

6 / 10

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अश्विनची ओळख आहे. त्याने कसोटीमध्ये आतापर्यंत ५२२ बळी, ३४२२ धावा, ६ शतके, दहावेळा सामनावीरचा पुरस्कार आणि दहावेळा मालिकावीरचा पुरस्कार जिंकला आहे.

7 / 10

सक्रिय खेळाडूंमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा सामानवीरचा पुरस्कार जिंकणाऱ्यांच्या यादीत अश्विनने रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांची बरोबरी साधली. या तिघांनीही दहावेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

8 / 10

रोहित शर्मा म्हणाला की, अश्विनने नेहमीच अष्टपैलू कामगिरी केली आहे. मी जर आता त्याच्याबद्दल बोललो तर ते पुरेसे ठरणार नाही. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये केलेल्या फलंदाजीचा त्याला फायदा झाला.

9 / 10

अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ५२२ बळींची नोंद आहे. तर त्याने वन डे आणि ट्वेंटी-२० मध्ये अनुक्रमे १५६ आणि ७२ असे बळी घेतले आहेत. यासह अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५० बळी पूर्ण केले.

10 / 10

अश्विन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. त्याने सर्वाधिक ३७वेळा पाच बळी पटकावण्याची किमया साधली. सर्वात जलद २५०, ३०० आणि ३५० बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज म्हणूनही त्याची ख्याती आहे.

टॅग्स :आर अश्विनभारत विरुद्ध बांगलादेशआंतरराष्ट्रीय क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ