IND vs BAN: टीम इंडियाला 'या' ६ बांगलादेशी खेळाडूंपासून धोका, पाकिस्तानात घातला धुमाकूळ

India vs Bangladesh 1st Test: पाकिस्तानी क्रिकेट संघाला याच ६ खेळाडूंना त्यांच्या घरच्या मैदानावर फोडला घाम

Bangladesh 6 match winner Players, IND vs BAN Test: बांगलादेशच्या संघाचा भारत दौरा १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दोन कसोटी मालिकांमधील पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेशच्या संघाची नुकतीच घोषणा झाली.

पाकिस्तानच्या संघाला त्यांच्याच जमीनीवर बांगलादेशच्या संघाने पराभवाची धूळ चारली. याच संघातील ६ खेळाडू भारतीय खेळपट्ट्यांवरही आपला जलवा दाखवण्यात अजिबात कसर सोडणार नाहीत. जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल-

याने पाकिस्तान विरूद्ध झालेल्या २ कसोटींच्या ४ डावात १० बळी टिपले. त्यातही त्याने एका डावात ५ तर एका डावात ४ बळी घेतले होते. फलंदाजीतही त्याने १५५ धावा केल्या. त्यामुळे तो 'मालिकावीर' ठरला.

या २१ वर्षांच्या खेळाडूने १५० किमी वेगाने गोलंदाजी पाकिस्तान विरूद्ध ६ बळी घेतले. त्यात रावळपिंडी कसोटीतील ४४ धावांत ४ बळींचा समावेश होता. आतापर्यंत केवळ ३ कसोटींमध्ये त्याने ११ बळी टिपले आहेत.

याने पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी मालिकेत ८ बळी घेतले. पहिल्या कसोटीत त्याला केवळ ३ बळी मिळाले. पण दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ४३ धावांत ५ बळी टिपून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

या खेळाडूला कमी लेखण्याची चूक कोणताही संघ करणार नाही. पाकिस्तान विरुद्ध २ कसोटींमध्ये शाकिब केवळ ५ बळी घेऊ शकला. पण त्यात फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर ४४ धावात ३ बळींचा समावेश आहे.

या अनुभवी यष्टीरक्षकाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याने एकूण २१३ धावा केल्या. त्यात १९१ धावांची तुफानी खेळी आणि विजयासाठी केलेल्या नाबाद २२ धावांच्या खेळीचा समावेश आहे.

या मधल्या फळीतील अनुभवी फलंदाजाने पाकिस्तान दौऱ्यावर १९४ धावा केल्या. त्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश होता. बांगलादेशची अवस्था ६ बाद २६ असताना लिटन दासने १३८ धावांची खेळी करत संघाला उभारी दिली.