अश्विन-जड्डूनं मोडला २४ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड; सचिन-झहीर खान जोडीचा 'तो' विक्रमही पडला मागे

अश्विन-जड्डूची कमाल, अडचणीत असलेल्या टीम इंडियाचा झाले भक्कम आधार

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीनं विक्रमी भागीदारीसर इतिहास रचला.

अश्विन जड्डू जोडीनं सातव्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. यासह त्यांनी बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत २४ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडित काढला.

अश्विन आणि जड्डू आता द्विशतकी भागीदारीच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. दुसऱ्या दिवशी ते हा टप्पा सहज पार करतील असे वाटते.

याआधी २००० मध्ये सौरव गांगुली आणि सुनील जोशी या जोडीनं बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी भारताकडून सर्वोत्तम भागीदारी नोंदवली होती. ढाका कसोटीत या जोडीनं १२१ धावांची भागीदारी रचली होती. २४ वर्षांपूर्वीचा हा विक्रम आता मागे पडला आहे.

रवींद्र जडेजा दुसऱ्यांदा सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारीचा वाटेकरी झाला. २०१७ मध्ये हैदराबाद कसोटीत जड्डूनं वृद्धिमान साहाच्या साथीनं सातव्या विकेटसाठी नाबाद ११८ धावांची भागीदारी रचली होती.

अश्विन जड्डू जोडीनं १९५ धावांच्या भागीदारीसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांचा विक्रमही मागे टाकला. या जोडीनं २००४ मध्ये ढाका कसोटीत नवव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचली होती.

अश्विन सातव्या विकेट्ससाठी जड्डूसोबत द्विशतकी भागीदारी सेट करण्याच्या उंबरठ्यावर आहे. जर ही द्विशतकी भागीदारी झाली तर अश्विन सातव्या विकेट्साठी दुसऱ्यांदा असा पराक्रम करणारा खेळाडू ठरेल. याआधी अश्विनने वेस्ट इंडीज विरुद्ध रोहित शर्मासोबत सातव्या विकेट्ससाठी २८० धावांची भागीदारी केली होती. ही भारताकडून सातव्या विकेट्सची सर्वोच्च भागीदीरी आहे.