रोहित शर्मा इंग्लंड, ऑस्ट्रेलियासमोर 'हिरो', पण बांगलादेशच्या पुढ्यात 'झिरो', पाहा आकडेवारी

India vs Bangladesh Tests: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बांगलादेश विरूद्ध रंगणार भारताची पुढील परीक्षा

श्रीलंकेविरूद्ध वनडे मालिकेत ३-० असा लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया बांगलादेशशी कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

भारत-बांगलादेश कसोटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा २०२५चा भाग असणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली संघात पुनरागमन करणार आहे. तो इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत खेळला नव्हता.

विराटसोबतच या मालिकेत रोहित शर्माच्या कामगिरीवरही साऱ्यांची नजर असणार आहे. बांगलादेशमध्ये भारताच्या डावाला दमदार सुरुवात मिळवून देण्यासाठी रोहित शर्माने तडाखेबाज सुरुवात करणे गरजेचे आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यांमध्ये रोहितने फटकेबाजी करत संघाला अपेक्षित सुरुवात मिळवून दिली होती. पण बांगलादेश विरूद्ध रोहितची आकडेवारी ही भारतीयांना चिंताग्रस्त करणारी आहे.

तुफानी सुरुवात करण्यात पटाईत असलेल्या रोहितची आकडेवारी फारच वाईट आहे. त्याने आतापर्यंत बांगलादेशविरूद्ध शतक, अर्धशतक तर सोडाच पण एकूण ५० धावाही गाठलेल्या नाहीत.

रोहित शर्माने बांगलादेशविरूद्ध आतापर्यंत ३ कसोटीच्या ३ डावांत केवळ ३३ धावा केल्या आहेत. आता रोहितकडून अपेक्षा आहे की त्याने आपली कामगिरी सुधारावी आणि धमाकेदार बॅटिंग करावी.