IND vs BAN, T20 World Cup: टीम इंडिया संघात करणार ३ बदल; बांगलादेश विरूद्ध उतरणार नवी Playing XI

भारताचा उद्या रंगणार बांगलादेशशी सामना

3 changes in Team India Playing XI vs Bangladesh: भारत आणि बांगलादेशचा संघ (IND vs BAN) बुधवारी एडिलेडमध्ये आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही संघ अजूनही T20 World Cup 2022 च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. ग्रुप 2 मध्ये टीम इंडिया दुसऱ्या तर बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे जो संघ सामना जिंकेल तो 'टेबल-टॉपर' बनेल आणि उपांत्य फेरीच्या अधिक जवळ पोहोचेल.

बांगलादेशच्या संघाने आतापर्यंत साखळी फेरीत ३ सामने खेळले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. पण झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या दोन्ही संघाविरूद्ध त्यांनी विजय मिळवला. त्यामुळेच ते या गटात भारताप्रमाणेच २ विजयांसोबत ४ गुणांवर आहेत. मात्र नेट रनरेटमुळे ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला. त्यावेळी भारताने संघात एक बदल केला होता. अक्षर पटेलऐवजी दीपक हुडा संघात आला होता, पण हा प्रयोग अयशस्वी ठरला आणि भारताला T20 World Cup 2022 मधील पहिला पराभवही पदरी आला. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया नव्या जोमाने आणि बदलांसह उतरणार असून Rohit Sharma आणि कोच Rahul Dravid संघात तीन महत्त्वाचे बदल होणार असल्याचे बोलले जात आहे.

सर्वात आधी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा (Deepak Hooda) याला संघातून बाहेर केले जाण्याची तीव्र शक्यता आहे. दीपक हुडाला भारतीय संघ अडचणीत असताना फलंदाजी मिळाली होती, पण तो ३ चेंडूत शून्य धावा काढून माघारी परतला. त्याच्या जागी अक्षर पटेल (Akshar Patel) संघात परत येऊ शकतो. त्याने आतापर्यंत २ सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.

संघातील दुसरा बदल हा क्रमाप्राप्तच आहे. आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात भारताच्या फिल्डिंगच्या वेळी दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) पाठीच्या दुखण्याचे उचल खाल्ली. त्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. त्यानंतर उर्वरित सामन्यात रिषभ पंतने (Rishabh Pant) किपिंग केली. त्यामुळे बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात कार्तिकला आराम देऊन त्याजागी पंतला संघात स्थान देण्याची शक्यता जास्त आहे.

रोहित बांगलादेश विरूद्ध संघात तिसरा बदल करण्याची बरीच शक्यता आहे. आर अश्विनला (R Ashwin) गेल्या तीनही सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती. पण त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. मागच्या सामन्यात तर आफ्रिकन फलंदाजांनी अश्विनची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे त्याच्या जागी युजवेंद्र चहलला (Yuzvendra-Chahal) संघात स्थान मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे.