Join us  

IND vs BAN, Test Series: बांगलादेशात इंग्लंड, ऑस्ट्रेलियाही झालीय पराभूत; भारताची लागणार मोठी 'कसोटी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 7:28 PM

Open in App
1 / 11

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. शनिवारी वन डे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला ज्यात भारताने बाजी मारली. मात्र मालिकेतील सलामीचे दोन सामने जिंकून यजमान बांगलादेशच्या संघाने 2-1 ने मालिका आपल्या नावावर केली. आता भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे.

2 / 11

वन डे मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघ लोकेश राहुलच्या नेतृत्वात यजमान संघाविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरूवात 14 डिसेंबरपासून होत आहे. पहिला सामना 14-18 डिसेंबर तर दुसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना 22-26 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल.

3 / 11

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्या गैरहजेरीमुळे संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला आहे. नवदीप सैनी आणि सौरभ कुमार खेळताना दिसणार आहेत. तर वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट 12 वर्षांनंतर कसोटी संघात परतला आहे.

4 / 11

बांगलादेशच्या धरतीवर संघांच्या कामगिरीवर भाष्य करायचे झाले तर, इथे 5 संघांनी किमान एक कसोटी सामना गमावला आहे. अशा स्थितीत भारतीय संघालाही संघर्ष करावा लागू शकतो. कारण याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वात वन डे मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. झिम्बाब्वेने येथे सर्वाधिक 6 कसोटी सामने गमावले आहेत.

5 / 11

वेस्ट इंडिजच्या संघाने बांगलादेशच्या धरतीवर 2 कसोटी सामने गमावले आहेत. तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांना 1-1 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताने अद्याप इथे एकही कसोटी सामना गमावला नाही. भारताने एकूण 8 सामने खेळले आहेत, ज्यातील 6 जिंकले आहेत आणि 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.

6 / 11

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनेही भारतीय संघासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. कारण भारताला 6 पैकी 5 सामने जिंकायचे आहेत. खरं तर भारतीय संघाला आगामी काळात ऑस्ट्रेलियासोबत 4 सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध आपला सर्वोत्तम विक्रम कायम राखाण्याचे राहुलसेनेसमोर आव्हान असेल.

7 / 11

एकूण कसोटी रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 11 सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाला 9 सामने जिंकण्यात यश आले आहे. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.

8 / 11

भारत आणि बांगलादेश यांच्यात तब्बल 3 वर्षानंतर कसोटी मालिका खेळवली जात आहे. शाकिब अल हसनच्या नेतृत्वात यजमान संघ बलाढ्य भारताला कडवी झुंज देण्यासाठी सज्ज झाला आहे.

9 / 11

2022 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र भारताला 3 सामने गमवावे लागले आहेत तर 2 सामन्यात विजय मिळाला आहे. म्हणजेच 60 टक्के सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला आहे. दुसरीकडे, बांगलादेशने 8 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र त्यांना केवळ एक सामना जिंकण्यात यश आले आहे.

10 / 11

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. आगामी मालिकेसाठी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी भारतीय संघाचा हिस्सा नसणार आहेत. तर नवदीप सैनी आणि सौरभ कुमार या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारत अ संघाचा आघाडीचा फलंदाज सौरभ कुमार एका मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे जयदेव उनाडकट हा देखील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात असणार आहे.

11 / 11

कसोटी मालिकेसाठी संघ - लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशलोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयबांगलादेश
Open in App