Join us  

Rohit Sharma, IND vs ENG 1st T20 I Live Updates : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इंग्लंडला नमवून जगात ठरला अव्वल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 7:44 AM

Open in App
1 / 9

India vs England 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ५० धावांनी विजय मिळवला. भारताच्या १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ १४८ धावांत तंबूत परतला. ५१ धावांची खेळी करणाऱ्या हार्दिकने चार विकेट्स घेत विक्रमाला गवसणी घातली. पण, या विजयासह कर्णधार रोहित शर्माने विश्वविक्रमाची नोंद केली.

2 / 9

रोहित शर्माने ( २४) दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर दीपक हुडा ( ३३) , सूर्यकुमार यादव ( ३९) यांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५१ धावा करताना ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक झळकावले.

3 / 9

दीपक व सूर्यकुमार यांनी मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली. हार्दिकने भारताच्या धावांचा वेग कायम ठेवला होता. पण, पुन्हा एकदा दिनेश कार्तिकच्या ( ११) आधी अक्षर पटेलला ( १७ ) पाठवण्याच्या निर्णयावर टीका होताना दिसतेय. भारताने ८ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारली. मोईन अली ( २-२६) व ख्रिस जॉर्डन ( २-२३) यांनी चांगली गोलंदाजी केली.

4 / 9

१९८ धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. हार्दिक पांड्या त्याच्या पहिल्याच षटकात डेवीड मलान ( २१) व लिएम लिव्हिंगस्टोन ( ०) यांची विकेट घेतली. ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने जेसन रॉय ( ४) यालाही माघारी पाठवले.

5 / 9

युजवेंद्र चहलने हॅरी ब्रूक ( २८) व मोईन अली ( ३६) यांना एकाच षटकात माघारी पाठवले. हार्दिकने ४ षटकांत ३३ धावा देताना ४ विकेट्स घेतला. ट्वेंटी-२०त एकाच सामन्यात ५०+ धावा व ४ विकेट्स घेणारा हार्दिक हा पहिला भारतीय आणि जगातील पाचवा खेळाडू ठरला.

6 / 9

ड्वेन ब्राव्हो ( ६६* व ४-३८ वि. भारत, लॉर्ड्स २००९), मोहम्मद हाफिज ( ७१ व ४-१० वि. झिम्बाव्बे, हरारे २०११), शेन वॉटसन ( ५९ व ४-१५ वि. इंग्लंड, एडलेड २०११) व एस शिनवारी ६१ व ४-१४ वि. इंग्लंड, साउदहॅम्प्टन २०२२) यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच इंग्लंडमध्ये दोनवेळा एकाच ट्वेंटी-२०त चार विकेट घेणाराही तो पहिलाच भारतीय ठरला. यापूर्वी २०१८मध्ये त्याने ३८ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.

7 / 9

अर्षदीपने पदार्पणातील पहिली विकेट घेताना रिसे टॉपली( ९) याला बाद केले. चहलने ३२ धावांत २ विकेट्स घेतल्या. अर्षदीपने अखेरच्या षटकात मॅट पर्किनसनची विकेट घेत इंग्लंडला १४८ धावांत गुंडाळले. अर्षदीपने १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना ५० धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

8 / 9

सलग १३ ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला कर्णधार ठरला. यापूर्वी सलग १२ सामने जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या असघर अफघान व रोमानियाच्या रमेश सथीसन यांच्या नावावर होता. पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखालील हा भारताचा सलग १५ वा विजय ( २ कसोटी) ठरला.

9 / 9

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माहार्दिक पांड्या
Open in App