Join us  

IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, भर मैदानात लपवावं लागलं तोंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 11:05 PM

Open in App
1 / 10

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : विराट कोहलीनं ( Virat Kohli) सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. विराट कोहलीनं ४६ चेंडूंत नाबाद ७७ धावा केल्या. त्यानं ८ चौकार व ४ षटकार खेचून १२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. हार्दिक पांड्यानं १७ धावांचे योगदान दिले आणि टीम इंडियानं ६ बाद १५६ धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियानं अखेरच्या पाच षटकांत ६९ धावा चोपल्या.

2 / 10

भारताच्या १५ षटकांत ५ बाद ८७ धावा झाल्या होत्या. विराट व हार्दिकनं सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ७० धावा जोडल्या. यात विराटनं १८ चेंडूंत ५० धावा चोपल्या, तर हार्दिकनं १७ धावा केल्या.

3 / 10

भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या धावांवर लगाम लावता आला नाही. जोस बटलरनं ( Jos Buttler) यानं एकहाती सामना फिरवला. बटलरनं ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह नाबाद ८३ धावा केल्या. बेअरस्टोनं २८ चेंडूंत ५ चौकारासह नाबाद ४० धावा केल्या. इंग्लंडनं हा सामना ८ विकेट्स व १० चेंडू राखून जिंकला.

4 / 10

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला जेसन रॉय ( ९) व जोस बटरल यांनी सावध सुरुवात करून दिली. युझवेंद्र चहलनं टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिलं, पण इंग्लंडनं पहिल्या पॉवरप्लेमध्ये १ बाद ५७ धावा करून कमबॅक केले. डेवीड मलान आणि जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

5 / 10

बटलर व जॉनी बेअरस्टो यांनी नाबाद खेळ करताना इंग्लंडला विजय मिळवून दिला. १५व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर बटलरनं युजवेंद्र चहलचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळला. विराट हा सोपा झेल झेलेल असेच वाटले होते, परंतु त्याच्या हातून झेल सुटला अन् त्यानं तोंड लपवलं.

6 / 10

जॉनी बेअरस्टोनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. इयॉन मॉर्गन, जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, केव्हीन पीटरसन यांच्यानंतर ट्वेंटी-20त १००० धावा करणारा तो इंग्लंडचा पाचवा फलंदाज ठरला.

7 / 10

२०१९ पासून आतापर्यं झालेल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत विराटनं सर्वाधिक ८ झेल सोडले. विराटच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.

8 / 10

ट्वेंटी-२०त भारतानं सर्वाधिक ९ वेळा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांकडून पराभव पत्करला. त्यानंतर न्यूझीलंडनं ८ वेळा भारताला पराभूत केलं आहे.

9 / 10

विराट कोहलीला ट्वेंटी-२०त ५०+ धावा करूनही सर्वाधिक ८ वेळा पराभव पत्करावा लागला. त्यानं फॅफ ड्यू प्लेसिसच्या विक्रमाशी बरोबरी केली, तर डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला.

10 / 10

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली