Join us  

Ind vs Eng 3rd Test : १९८२नंतर इंग्लंडच्या कर्णधारांमध्ये जो रूट ठरला सरस, वासीम अक्रमच्याही विक्रमाशी बरोबरी

By स्वदेश घाणेकर | Published: February 25, 2021 4:56 PM

Open in App
1 / 8

Ind vs Eng Pink Ball Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) यानं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरणाऱ्या इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या डावात कमाल केली. कर्णधार जो रूटनं गोलंदाजीची सूत्र हाती घेताना टीम इंडियाच्या डावाला मोठं भगदाड पाडलं. रूटनं पहिल्या तीन षटकांत एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या.

2 / 8

३ बाद ११४ धावांवरून टीम इंडियाची ८ बाद १२५ अशी घसरगुंडी उडाली. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी थोडा संघर्ष केला, परंतु ते भारताची आघाडी ३३ धावांपर्यंतच नेऊ शकले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ११२ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव १४५ धावांवर गडगडला. रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचे अर्धशतक हीच टीम इंडियासाठी पॉझिटीव्ह गोष्ट ठरली. जो रूटनं पाच विकेट्स घेतल्या.

3 / 8

फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडचा संघ जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड या जलदगीत गोलंदाजांसह मैदानावर उतरला. त्यामुळे त्यांच्याकडे जॅक लिच हा एकमेव फिरकी गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत कर्णधार जो रूटनं चेंडू हातात घेतला आणि टीम इंडियाला हादरवून सोडलं.

4 / 8

३ बाद ११४ वरून भारताचा डाव ८ बाद १२५ असा गडगडला. ११ धावांत टीम इंडियाचे पाच फलंदाज माघारी परतले. त्यापैकी रूटनं पहिल्या तीन षटकांत एकही धाव न देता तीन फलंदाजांना माघारी पाठवले. रिषभ पंत ( १), वॉशिंग्टन सुंदर ( ०) आणि अक्षर पटेल ( ०) हे तीन डावखुरे फलंदाज रूटच्या ऑफ स्पिन गोलंदाजीच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर रुटनं आर अश्विनलाही माघारी जाण्यास भाग पाडले.

5 / 8

कसोटी क्रिकेटमधील फिरकीपटूनं सर्वात कमी धावांत पाच विकेट्स घेण्याची ही सर्वोत्तम कामगिरी. यापूर्वी १९९२-९३साली टीम मे यानं वेस्ट इंडिजविरुद्ध ९ धावांत ५, तर २००४-०५मध्ये मायकेल क्लार्क यानं भारताविरुद्ध ९ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

6 / 8

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधाराची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. १९२४मध्ये आर्थर गिलिगन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. रुटनं ( ५/८) वेस्ट इंडिजचे कर्टनी वॉल्श ( ६/१८ वि. न्यूझीलंड, १९९५) यांचा विक्रम मोडला.

7 / 8

एकाच कसोटी मालिकेत द्विशतक आणि पाच विकेट्स असा पराक्रम करणारा रुट हा तिसरा कर्णधार ठरला. यापूर्वी डेनीस अॅटकिसन ( वि. ऑस्ट्रेलिया १९५५) आणि वासीम अक्रम ( वि. झिम्बाब्वे, १९९६) यांनी अशी कामगिरी केली आहे.

8 / 8

रुटनं ६.२ षटकांत ८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. १९८२नंतर इंग्लंडच्या कर्णधारानं कसोटी क्रिकेटमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या विक्रमात गुब्बी अॅलन ( ७-८० वि. भारत, १९३६), आर्थूर गिलिगॅन ( ६-७ वि. दक्षिण आफ्रिका, १९२४) व बॉब विली ( ६-१०१ वि. भारत, १९८२) यांनी हा पराक्रम केला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटवसीम अक्रम