Join us

IND vs ENG, 4th Test : इंग्लंडसाठी ट्रिकी खेळपट्टी; टीम इंडिया चौथ्या कसोटीत दोन बदल करून मोठा डाव टाकणार

By स्वदेश घाणेकर | Updated: March 1, 2021 11:55 IST

Open in App
1 / 10

India vs England, 4th Test : टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून ( Pink Ball Test) चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्याच्या निर्धारानं टीम इंडिया चौथ्या कसोटीत मैदानावर उतरणार आहे.

2 / 10

डे नाईट कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडचा संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. पण, ते टीम इंडियालाही शर्यतीतून बाहेर काढू शकतात आणि ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा करू शकतात.

3 / 10

भारतीय संघही त्यांचं आव्हान परतवून लावण्यासाठी सज्ज झाला आहे आणि त्यासाठी BCCIनं ट्रिकी खेळपट्टी तयार केली आहे. चौथ्या कसोटीत टीम इंडिया दोन बदलांसह मैदानावर उतरणार आहे.

4 / 10

चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहनं वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आणि ती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे.

5 / 10

तिसऱ्या कसोटीचा निकाल दोन दिवसांत लागला होता. अक्षर पटेलनं दोन्ही डावांत मिळून ११ विकेट्स घेतल्या होत्या, तर आर अश्विननं ७ विकेट्स घेतल्या. या सामन्यात ३० पैकी २८ विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या. त्यामुळे खेळपट्टीवरून वाद सुरू आहे.

6 / 10

अशात चौथ्या कसोटीसाठीही फिरकीला पोषकच खेळपट्टी बनवण्यात आली आहे. खेळपट्टीवर गवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

7 / 10

त्यामुळे कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) संघात दोन बदल करण्याच्या तयारीत आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. यादवनं नुकतीच फिटनेस टेस्ट पास केली आहे.

8 / 10

तिसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला जास्त षटकं टाकण्याची संधी मिळाली नाही. त्याच्याजागी कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पटकावू शकतो. कुलदीप, आर अश्विन आणि अक्षर पटेल या तीन फिरकीपटूंसह संघ मैदानावर उतरणार आहे.

9 / 10

भारतीय संघ ( Playing XI) - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, उमेश यादव.

10 / 10

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहअक्षर पटेलकुलदीप यादवइशांत शर्मारोहित शर्माशुभमन गिलविराट कोहलीचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणे