Join us  

IND vs ENG : ऑस्ट्रेलियाचा चौथ्या कसोटीत इंग्लंडला पाठिंबा, अ‍ॅशेसमधील शत्रू टीम इंडियाविरुद्ध एकवटले; जाणून घ्या कारण

By स्वदेश घाणेकर | Published: March 02, 2021 2:21 PM

Open in App
1 / 10

India vs England, 4th Test : भारतानं तिसऱ्या कसोटीत ( Day Night Test) दणदणीत विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

2 / 10

श्रीलंका दौऱा गाजवून भारतात आलेल्या इंग्लंडच्या संघानं पहिल्याच सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर टीम इंडियानं पाहुण्यांना नाचवले आणि सलग दोन सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली.

3 / 10

मालिकेतील चौथा अन् अंतिम सामना ४ ते ८ मार्च या कालावधीत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानावर उतरली आहे. ( Australia cheering for England in fourth Test)

4 / 10

ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्य्रू मॅकडोनाल्ड काय म्हणतात? - या सामन्यावर आमचाही फायदा दडलेला आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर आम्हाला इंग्लंडला पाठींबा द्यावा लागत आहे. आशा करतो की ते त्यांची कामगिरी चोख बजावतील. आम्ही इंग्लंडला शूभेच्छा देतो, असे मॅकडोनाल्ड म्हणाले.

5 / 10

भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल कोणत्याही संघाच्या बाजूनं लागला असता तरी त्याचा थोडासा फायदा ऑस्ट्रेलियालाही झाला असता. आज इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी असती तर ऑस्ट्रेलिया टीम इंडियाच्या बाजूनं उभी राहिली असती आणि त्याला कारणही तसेच आहे.

6 / 10

ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आणि कसोटी मालिका रद्द करावी लागली. त्याचा फटका त्यांनाच बसला आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) च्या अंतिम सामन्यासाठी भारत-इंग्लंड यांच्यातली मालिका उपांत्य फेरीचा सामना झाला.

7 / 10

न्यूझीलंडनं आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केल्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाही शर्यतीत राहिली. पण, ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी भारत-इंग्लंड मालिकेच्या निकालावर अवलंबून राहवे लागत आहे.

8 / 10

तिसऱ्या कसोटीतील पराभवामुळे इंग्लंडचे WTC च्या अंतिम सामन्याचे तिकीट कापलं गेलं असलं तरी ऑस्ट्रेलिया अजूनही शर्यतीत आहे. इंग्लंडनं चौथी कसोटी जिंकल्यास मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल आणि ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यात खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडला पाठींबा असणार आहे.

9 / 10

भारतानं अहमदाबाद कसोटी ( Ahmedabad Test) जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात ४९० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. भारताच्या विजयाची टक्केवारी ७१% अशी झाली आहे. इंग्लंड ६४.१ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.

10 / 10

भारताला ICC World Test Championship च्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ३-१, २-१ असा निकाल हवा आहे, तर या मालिकेचा निकाल २-२ असा बरोबरीत लागल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाइंग्लंडआॅस्ट्रेलिया