Join us  

IND vs ENG, 4th Test : टीम इंडियाला ट्रिपल बोनस; मालिका विजय, WTCच्या फायनलमध्ये अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 4:30 PM

Open in App
1 / 10

IND vs ENG, 4th Test : इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतानं ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी १३५ धावांवर गुंडाळला. अक्षर पटेलनं ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, आर अश्विननंही ४७ धावांत पाच बळी टिपले.

2 / 10

वॉशिंग्टन सुंदरच्या ( Washington Sunder) हुकलेल्या शतकानं सर्वांना वाईट वाटलं... ९६ धावांवर खेळत असताना समोर तीन फलंदाज होते, परंतु एकामागून एक तिघेही माघारी परतले. पण, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) विजय मिळवून भारतानं मालिका ३-१ अशी खिशात घातली.

3 / 10

चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस रिषभ पंतनं गाजवला. ६ बाद १४६ वरून त्यानं वॉशिंग्टनच्या साथीनं टीम इंडियाला २५९ धावांपर्यंत नेले. रिषभ व वॉशिंग्टन यांनी सातव्या विकेटसाठी १५८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या. रिषभ ११८ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०१ धावांवर माघारी परतला.

4 / 10

भारताकडून प्रथमच सातव्या आणि आठव्या विकेटसाठी एकाच कसोटीत शतकी भागीदारी झाल्या. वॉशिंग्टन सुंदर-रिषभ पंत यांनी सातव्या विकेटसाठी ११३ ( १५८ चेंडू ) आणि वॉशिंग्टन - अक्षर पटेल १०६ ( १७९ चेंडू) यांनी शतकी भागीदारी केली.

5 / 10

भारताकडून प्रथमच सातव्या आणि आठव्या विकेटसाठी एकाच कसोटीत शतकी भागीदारी झाल्या. वॉशिंग्टन सुंदर-रिषभ पंत यांनी सातव्या विकेटसाठी ११३ ( १५८ चेंडू ) आणि वॉशिंग्टन - अक्षर पटेल १०६ ( १७९ चेंडू) यांनी शतकी भागीदारी केली.

6 / 10

इंग्लंडचा दुसरा डाव १३५ धावांवर गडगडला. अक्षर पटेलनं ४८ धावांत पाच विकेट घेतल्या, आर अश्विननंही ४७ धावांत पाच बळी टिपले. इंग्लंडकडून डॅन लॉरेन्सनं सर्वाधिक ५० धावा केल्या. जो रूटनं ३० धावा केल्या.

7 / 10

अक्षर पटेलनं कसोटीत पदार्पण केल्यापासून सहा डावांमध्ये चार वेळा पाच + विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक २८* विकेट्स ( ४ सामने) घेत अक्षर पटेलनं अनेक दिग्गजांना मागे टाकले. दीलीप जोशी यांनी ६ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर शिवलाल यादव ( २४ विकेट्स, ६ सामने), आर अश्विन ( २२ विकेट्स , ३ सामने) यांचा क्रमांक येतो.

8 / 10

या विजयाबरोबरच टीम इंडियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. १८ जूनला लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) असा अंतिम सामना रंगणार आहे.

9 / 10

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडियानं सर्वाधिक १२ विजय मिळवले. सर्वाधिक पाच मालिका जिंकण्याचा आणि सर्वाधिक ५२० गुणांचा मानही टीम इंडियानं पटकावला. भारताच्या खात्यात ७२.२ टक्के गुण आहेत.

10 / 10

टीम इंडियानं मालिका ३-१ अशी जिंकून आयसीसी कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले. त्यांनी न्यूझीलंडला दुसऱ्या स्थानी ढकलले. भारताच्या खात्यात १२२ गुण झाले आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआयसीसीजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धारिषभ पंतअक्षर पटेलआर अश्विनवॉशिंग्टन सुंदर