Join us  

IND vs ENG 5th T20, Virat Kohli : विराट कोहलीनं विजयी चषकासह जे केलं ते साऱ्यांनी पाहिलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:42 PM

Open in App
1 / 8

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहली या नव्या जोडीनं टीम इंडियाच्या धावांचा मजबूत पाया रचला. रोहित व विराट या दोघांनी अर्धशतकी खेळी केली, तर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या यांनीही हात धुवून घेतले. भारतानं २० षटकांत २ बाद २२४ धावा चोपून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला.

2 / 8

जोस बटलर ( Jos Buttler ) व डेवीड मलान ( Dawid Malan) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाचं टेंशन वाढवलं होतं, परंतु शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) मॅजिकल ओव्हर टाकली आणि टीम इंडियानं सामन्याला कलाटणी दिली. इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या आणि टीम इंडियानं हा सामना ३६ धावांनी जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली

3 / 8

रोहितनं ३४ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचून ६४ धावा केल्या. सूर्यकुमारनं १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ३२ धावा केल्या. विराटनं ट्वेंटी-२०तील २८वे अर्धशतक ३७ चेंडूंत पूर्ण केलं. हार्दिक पांड्या १७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३९ धावांवर नाबाद राहिला. विराट ५२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला.

4 / 8

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारनं धक्का दिला. पण, जोस बटलर ( Jos Buttler ) व डेवीड मलान ( Dawid Malan) यांनी दुसऱ्या विकेटसाठी चेंडूंत १३० धावांची भागीदारी केली. १३व्या षटकात ही भागीदारी तुटली. या दोघांनी ८२ भुवीनं जोस बटलरला ( ५२) बाद केले.

5 / 8

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा विक्रम डेवीड मलाननं नावावर केला. त्यानं २४ डावांत हा पराक्रम करताना बाबर आझम ( २६ डाव) व विराट कोहली ( २७) यांचा विक्रम मोडला. ( Dawid Malan becomes the quickest batsman to complete 1000 T20I run) १५व्या षटकात शार्दूल ठाकूरनं सामन्याला कलाटणी दिली. त्यानं जॉनी बेअरस्टो ( ७) व मलान य़ांना बाद केले. मलान ४६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला.

6 / 8

१ बाद १३० धावांवरून इंग्लंडचा डाव ५ बाद १४२ असा गडगडला. त्यानंतर टीम इंडियानं हा सामना सहज जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराटला मॅन ऑफ दी सीरिजचा पुरस्कार मिळाला. तर या सामन्यात उत्तम गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमार मॅन ऑफी दी मॅचचा मानकरी ठरला.

7 / 8

या सामन्यानंतर मिळालेली ट्रॉफी विराटनं सूर्यकुमार यादव व इशान किशन यांच्या हाती सोपवली. या दोघांनी या मालिकेतून टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केलं. विराटच्या या कृतीचं कौतुक होत आहे.

8 / 8

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीसूर्यकुमार अशोक यादवइशान किशन