Join us  

Ind vs Eng Live test Match : इंग्लंडने मोडले १२ मोठे विक्रम, भारताच्या नावावर नकोसा पराक्रम; विराट कोहलीने लपवले तोंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 5:20 PM

Open in App
1 / 14

३७८ धावांचे लक्ष्य समोर असूनही इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळ केला. जो रूट ( Joe Root) व जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांचे विशेष कौतुक. दोघांनी वैयक्तिक शतक झळकावून इंग्लंडला ७ विकेट्स राखून विजय मिळवून देताना मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.

2 / 14

भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत ( ५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४५ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले.

3 / 14

भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. पण, जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी सर्व गणित बिघडवले. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

4 / 14

एडबस्टन कसोटीत आतापर्यंत २८४ धावांचा यशस्वी पाठलाग करता आला होता आणि इंग्लंडने आज ३७८ धावांचे लक्ष्य सर करून इतिहास रचला. इंग्लंडने ७ विकेट्स राखून ही कसोटी जिंकताना पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आणि भारताचे २००७ नंतर इंग्लंडमध्ये कसोटी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

5 / 14

जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी २०० धावांची भागीदारी करून सामना फिरवला व विक्रमाला गवसणी घातली. बेअरस्टोला १४ धावांवर दिलेले जीवदान महागात पडले. आर्टन आणि गूच यांनी १९९१ मध्ये चौथ्या डावात इंग्लंडसाठी द्विशतकी भागीदारी केली होती आणि त्यानंतर आज हा पराक्रम झाला.

6 / 14

कसोटी क्रिकेटमध्ये रुटने २८ वे शतक झळकावून स्टीव्ह स्मिथ व विराट कोहली यांना ( २७ शतकं) मागे टाकले. जानेवारी २०२१नंतर रुटचे हे ११ वे कसोटी शतक ठरले. भारताविरुद्ध सर्वाधिक ९ शतकं करणारा रुट हा जगातील पहिला फलंदाज ठरला. शिवाय ग्रॅहम गूच यांच्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ७००+ धावा करणाराही तो पहिला फलंदाज ठरला.

7 / 14

जॉनी बेअरस्टो १४५ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह ११४ धावांवर, तर जो रूट १७३ चेंडूंत १९ चौकार व १ षटकारासह १४२ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने पाचव्या दिवशी दीड तासांत ११९ धावा करून विजय पक्का केला. इंग्लंडचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २०१९मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३५९ धावांचे लक्ष्य ( ९-३६२) पार केले होते.

8 / 14

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ६ शतकं करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांमध्ये जॉनी बेअरस्टोने नाव नोंदवले. डेनिस कॉम्प्टन ( १९४७), मायकेल वॉन ( २००२), जो रूट ( २०२१) यांनी कॅलेंडर वर्षात ६ शतकं झळकावली आहेत.

9 / 14

भारताविरुद्ध एकाच मालिकेत सर्वाधिक ४ शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांत जो रूटचा समावेश झाला आहे. सर डॉन ब्रँडमन ( १९४७), सर एव्हर्टन विक्स ( १९४८) , मुजस्सर नाजर ( १९८२) व स्टीव्ह स्मिथ ( २०१४) यांनी हा पराक्रम केला आहे.

10 / 14

जो रूट व जॉनी बेअऱस्टो यांची २६९ धावांची भागीदारी ही भारताविरुद्धची चौथ्या डावातील सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी १९८५मध्ये आर डाएस व डी मेंडीस या श्रीलंकेच्या जोडीने २१६ धावांची भागीदारी केली होती.

11 / 14

इंग्लंडकडून घरच्या मैदानावर चौथ्या डावात सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही जो रूट व जॉनी बेअरस्टो यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. या दोघांनी २६९ धावांची भागीदारी करताना, बुचर व हुसैन यांचा २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८१ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.

12 / 14

१४ वर्षांनंतर कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा जॉनी बेअऱस्टो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. २००८मध्ये चेन्नई कसोटीत सर अँड्य्रू स्ट्रॉसने ही कामगिरी केली होती.

13 / 14

चौथ्या डावांत धावांचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो व जो रूट यांची नाबाद २६९ धावांची भागीदारी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी ब्रॅडमन-मॉरिस ( ऑस्ट्रेलिया - ३०१ वि. इंग्लंड, १९४८) आणि गोमेज-ग्रिनिज ( वेस्ट इंडिज - २८७* वि. इंग्लंड, १९८४) यांनी हा पराक्रम केला आहे.

14 / 14

कसोटी क्रिकेटमध्ये ३५०+ धावांचा यशस्वी बचाव करण्यात भारतीय संघाला प्रथमच अपयश आले. तर सलग चार सामन्यांत २५०+ धावांचा यशस्वी पाठलाग करणारा इंग्लंड हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूटविराट कोहलीजसप्रित बुमराहबेन स्टोक्स
Open in App