Join us  

Rishabh Pant, Ind vs Eng Live test Match : MS Dhoni लाही जे जमले नाही ते रिषभ पंतने केले; १९७३, १९५० सालचे अनेक विक्रम मोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 4:34 PM

Open in App
1 / 7

Ind Vs Eng test Match live : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) याच्यानंतर रिषभ पंतने ( Rishabh Pant) अर्धशतक झळकावताना भारताची आघाडी तीनशे पार नेली. चेतेश्वर पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांसह ६६ धावांवर माघारी परतला. त्याने हनुमा विहारी, विराट कोहली, रिषभ पंत यांच्यासह महत्त्वाची भागीदारी केली.

2 / 7

पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या रिषभने दुसऱ्या डावात अर्धशतक पूर्ण केले. आजच्या खेळीसह त्याने १९७३ साली भारताच्या फारुख इंजिनियर यांचा विक्रम मोडलाच शिवाय १९५० सालापासून वेस्ट इंडिजच्या दिग्गजाच्या नावावर असलेला विक्रमही स्वतःच्या नावे केला. रिषभ ८६ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५७ धावांवर बाद झाला आणि भारताने ६ बाद १९८ धावा केल्या आहेत.

3 / 7

टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला आघाडी मिळवून दिली.

4 / 7

दुसऱ्या डावात शुबमन गिल ( ४), हनुमा विहारी ( ११) व विराट कोहली (२०) माघारी परतले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी भारताचा डाव सावरला. एडबस्टन येथे ३६ वर्षांनंतर कसोटीत अर्धशतक झळकावणारा पुजारा हा भारताचा पहिला सलामीवीर ठरला. सुनील गावस्कर यांनी १९८६ साली येथे ५४ धावा केल्या होत्या.

5 / 7

एडबस्टन येथे आतापर्यंत चौथ्या डावात २८१ धावांचे यशस्वी लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने पार केले होते. पुजारा माघारी परतल्यानंतर रिषभने अर्धशतक झळकावले. परदेशात एकाच सामन्यात शतक व अर्धशतक झळकावणारा रिषभ हा भारताचा पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला.

6 / 7

या सामन्यात रिषभने पहिल्या डावात १४६ आणि दुसऱ्या डावात ५७ अशा एकूण २००+ धावा करून विक्रम केला. भारताबाहेर एकाच कसोटीत २००+ धावा करणारा तो भारताचा पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला.

7 / 7

इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटीत शतक व अर्धशतक अशी खेळी करणारा तो दुसरा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. यापूर्वी १९७३ मध्ये फारूख इंजिनियर्स यांनी मुंबईत झालेल्या कसोटीत १२१ व ६६ धावा केल्या होत्या. इंग्लंडमध्ये परदेशी यष्टिरक्षक-फलंदाजाने २००+ धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी १९५०मध्ये वेस्ट इंडिजच्या क्लाईड वॅलकॉट यांनी लॉर्ड्स कसोटीत १४+१६८* अशा एकूण १८२ धावा केल्या होत्या.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतमहेंद्रसिंग धोनी
Open in App