IND vs ENG : टीम इंडियात जागा 'फिक्स' करण्याच्या शर्यतीत 'रिस्क झोन'मधील ३ चेहरे

भारतीय संघात जागा मिळवणं अन् मिळालेली संधी टिकवून ठेवणं हे फार मोठं टास्क आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका युवा काही युवा खेळाडूंसाठी एकदम खास असणार आहे.

सध्याच्या घडीला कुणाला संधी द्यावी अन् कुणाला बाहेर काढायचं असा मोठा पेच टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर असतो. इंग्लंड दौऱ्यात असे काही चेहरे आहेत ज्यांच्यासाठी या मालिकेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागेल.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत अक्षर पटेल उप कॅप्टन आहे. त्यामुळे त्याची जागा फिक्स आाहे. आता त्यामुळे अन्य खेळाडूला धोका निर्माण होतोय त्यात वॉशिंग्टन सुंदरचा नंबर लागतो. त्याला संधी मिळाली की सोनं करावचं लागेल. नाहीतरी टी-२० संघात प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान डळमळीत होईल.

नितीशकुमार रेड्डीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटीत धमाका केलाय. पण टी-२० क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला आणखी जोर लावावा लागेल.

हार्दिक पांड्याची संघातील जागा फिक्स असल्यामुळे नितीशकुमार रेड्डी अन् रियान पराग त्याच्यात फाइट असेल.

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत कुणाला किती संधी मिळणार अन् त्या संधीचं सोन करण्यात कोण यशस्वी ठरणार ते पाहण्याजोगे असेल.

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत कुणाला किती संधी मिळणार अन् त्या संधीचं सोन करण्यात कोण यशस्वी ठरणार ते पाहण्याजोगे असेल.