IND vs NZ, 1st ODI Live : इतिहास घडला! शुभमन गिलने Viv Richards यांच्यासह विराट कोहलीचाही सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला

India vs New Zealand, 1st ODI Live : रोहित शर्मा, विराट कोहली व इशान किशन असे तीन फलंदाज माघारी परल्यानंतर शुभमन गिलने टीम इंडियाचा डाव सारवला.

India vs New Zealand, 1st ODI Live : रोहित शर्मा, विराट कोहली व इशान किशन असे तीन फलंदाज माघारी परल्यानंतर शुभमन गिलने टीम इंडियाचा डाव सारवला. सूर्यकुमार यादवच्या सोबतीने त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना केला अन् वन डे तील तिसरे शतक पूर्ण केले. शुभमनची वादळी खेळी अशीच सुरू राहिली अन् त्याने रेकॉर्डची नोंद केली.

रोहित व शुभमन ही जोडी सलामीला आली अन् आज रोहित चांगल्या फॉर्मात दिसला. पण, पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यापासून तो वंचित राहिला. रोहित ३८ चेंडूंत ३४ धावांवर ( ४ चौकार व २ षटकार) माघारी परतला. विराट कोहली ( ८) व इशान किशन ( ५) हे स्वस्तात माघारी परतले.

सूर्यकुमार यादव मैदानावर येताच स्टेडियम त्याच्या जयघोषाने दणाणून निघाले. सूर्या व शुभमन यांनी भारताचा डाव सावरताना ५२ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. डॅरील मिचेलने सूर्या ३१ धावांवर सँटनरच्या हातात सोपा झेल देऊन माघारी पाठवले. शुभमन गिलने ८६ चेंडूंत शतक पूर्ण केले.

गिलचे हे वन डे क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले अन् त्याने १९ डावांमध्ये हा पराक्रम करताना भारताकडून सर्वात वेगाने तीन वन डे शतक झळकावण्याचा लोकेश राहुलचा ( २४) विक्रम मोडला. शिखर धवन १७ डावांमध्ये हा पराक्रम करून अव्वल स्थानी आहे.

वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावांचा विक्रम शुभमनने नावावर केला. त्याने १९ इनिंग्जमध्ये हा पल्ला ओलांडताना विराट कोहली व शिखर धवन ( २४ इनिंग्ज) यांच्या नावावरील विक्रम मोडला. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०००+ धावा करणारा तो फलंदाज ठरला.

जगात शुभमनने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानचा फाखर जमान १८ इनिंग्जसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचा इमाम उल हकनेही १९ डावांत हा पराक्रम केला होता. शुभमनने सर व्हिव्हियन रिचर्ड ( २१ इनिंग्ज) यांचा विक्रम मोडला.