Join us  

IND vs NZ, 1st Test Live Updates : 'ते' ५२ चेंडू अन् भारतीय वंशाच्या खेळाडूंकडून टीम इंडिया 'लॉकडाऊन'; रोहमर्षक सामन्यात न्यूझीलंडची झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 4:59 PM

Open in App
1 / 8

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारतानं विजयासाठी ठेवलेल्या २८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं १२८ धावा असताना कर्णधार केन विलियम्सनला गमावले. आता न्यूझीलंडचा पराभव निश्चित कारण रविंद्र जडेजा, आर अश्विन व अक्षर पटेल या फिरकीपटूंसमोर किवींचे तळाचे ४ फलंदाज २५ षटकं टिकणे अवघड होते.

2 / 8

कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यानंही आपल्या भात्यातील धारधार शस्त्र असलेल्या या फिरकीपटूंना कायम ठेवले. अक्षर पटेलची एन्ट्री उशीरा झाली असली तरी अश्विन व जडेजा ही अनुभवी जोडी किवींच्या विकेट पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसली.

3 / 8

केन बाद झाला त्यावेळेस २५ षटकांचा खेळ बाकी होता अन् टॉम ब्लंडल, कायले जेमिन्सन, टीम साऊदी, राचिन व पटेल हे तळाचे फलंदाज होते. अश्विनच्या गोलंदाजीवर ब्लंडल दुर्दैवी म्हणजे त्याच्याच बॅटीची किनार लागून चेंडू यष्टिंवर आदळून बाद झाला.

4 / 8

यानंतर सारे गोलंदाजच होते. म्हणजे टीम इंडियाच्या अनुभवी फिरकीपटूंसमोर पानी कम चाय... त्यामुळे सारे निर्धास्त होते. चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर यांच्याकडून झेल सुटूनही टीम इंडियाच्या खेळाडूंना विजय आपलाच असे वाटत होते. ब्लंडल व राचिन यांनी ५५ चेंडूंत १० धावांची भागीदारी केली. म्हणजे जवळपास ९ षटकं ही जोडी खेळली.

5 / 8

त्यानंतर जेमिन्सन व राचिन यांनी ४६ चेंडू म्हणजेच ८ षटकं खेळून काढली. किवींना यापरिस्थितीत धावांपेक्षा विकेट टिकवणे महत्त्वाचे होते. जडेजानं किवींना धक्का देताना जेमिन्सनला LBW केले, परंतु त्यानं DRS घेतला असता तर तो नाबाद ठरला असता.

6 / 8

टीम साऊदीनं राचिनसह २० चेंडू खेळून काढली. आता एक विकेट अन् भारताकडे जवळपास १० षटकं होती. त्यात अंधुक प्रकाशाची तक्रार करूनही अम्पायरनं तांत्रिक पुरावा देत एकेक षटक वाढवलं. राचिन व अजाझ पटेल या भारतीय वंशाच्या जोडीनं ती ५२ चेंडू मोठा धैर्यानं खेळून काढली अन् भारताला अनिर्णीत निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले.

7 / 8

राचिन ९१ चेंडूंत १८ धावांवर, तर पटेल २३ चेंडूंत २ धावांवर नाबाद राहिला. संक्षिप्त धावफलक - भारत पहिला डाव ३४५ व दुसरा डाव ७ बाद २३४ ( डाव घोषित) वि. वि. न्यूझीलंड - पहिला डाव २९६ व दुसरा डाव ९ बाद १६५ धावा

8 / 8

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडकेन विल्यमसनआर अश्विनरवींद्र जडेजाअक्षर पटेल
Open in App