Join us  

IND vs NZ : भारताचा दारुण पराभव! तीन दशकांनंतर न्यूझीलंडचा विजय; टीम इंडिया कुठे चुकली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 1:16 PM

Open in App
1 / 10

पहिल्या कसोटी सामन्यात यजमान भारताचा पराभव करुन न्यूझीलंडने विजयी सलामी दिली. या विजयासह किवी संघाने तब्बल ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला. शेवटच्या वेळी १९८८ मध्ये न्यूझीलंडने भारतात विजय संपादन केला होता.

2 / 10

बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. सामन्याच्या पाचव्या दिवशी किवी संघाला विजयासाठी अवघ्या १०७ धावा करायच्या होत्या.

3 / 10

मग न्यूझीलंडने दोन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. शेवटच्या दिवशी रचिन रवींद्र आणि विल यंग यांच्यातील ७२ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाचा पराभव निश्चित केला. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताकडून बळी घेणारा एकमेव गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला, त्याने २ फलंदाजांना बाद केले.

4 / 10

न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा केल्या. मग त्यासंदर्भातील प्रश्नावर व्यक्त होताना रोहितने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकला अशी प्रामाणिक कबुली दिली.

5 / 10

मात्र, दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळी केली. सर्फराज खान (१५०) आणि रिषभ पंतच्या (९९) धावांमुळे भारताने आघाडी घेतली. मात्र, शेवटच्या फळीतील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता न आल्याने टीम इंडियाने आयती संधी गमावली.

6 / 10

पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या ४६ धावांत गडगडली. मग न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात ४०२ धावा करुन यजमानांची कोंडी केली. दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद ४६२ धावा केल्याने टीम इंडियाला १०६ धावांची आघाडी मिळाली. मोठी आघाडी न मिळाल्याने भारतीय गोलंदाजांना लढण्याची संधीच मिळाली नाही.

7 / 10

त्यामुळे विजयी सलामी देण्यासाठी न्यूझीलंडसमोर अवघ्या १०७ धावांचे आव्हान होते, ज्याचा पाहुण्या संघाने सहज पाठलाग केला. दरम्यान, लोकेश राहुल, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे त्रिकुट सपशेल अपयशी ठरल्याने भारताला मोठी आघाडी घेता आली नाही.

8 / 10

कर्णधार रोहित शर्मा (५२) धावा करुन तंबूत परतला मग विराट कोहलीने डाव सावरला. त्यानंतर रिषभ आणि सर्फराजच्या जोडीने भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. उभय शिलेदार मैदानात असेपर्यंत टीम इंडिया मोठी आघाडी घेण्यात यश मिळवेल असे वाटत होते.

9 / 10

पण, ४०८ धावसंख्या असताना भारताच्या हातात सात गडी होते, मात्र पुढच्या ५४ धावांत भारत सर्वबाद झाला अन् पाहुण्या संघाला मोठा फायदा झाला. एकूणच सर्फराज बाद होताच भारताची गाडी रुळावरुन घसरली. आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडला भारतीय भूमीवर फक्त दोन कसोटी सामने जिंकता आले होते.

10 / 10

न्यूझीलंडचा पहिला विजय १९६९ मध्ये आणि दुसरा विजय १९८८ मध्ये झाला होता. आता ३६ वर्षांनंतर न्यूझीलंडने भारतात कसोटी जिंकून इतिहास रचला आहे. न्यूझीलंडच्या विजयात मॅट हेनरीचे मोठे योगदान राहिले, ज्याने २ डावात एकूण ८ बळी घेतले. त्याच्याशिवाय फलंदाजीमध्ये रचिन रवींद्रने दोन्ही डावात एकूण १७३ धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ