IND vs NZ, 2nd T20I: ससा अन् कासवाची गोष्ट! संथ खेळी करूनही सूर्यकुमार यादवला 'मॅन ऑफ द मॅच'; जाणून घ्या कारण!

IND vs NZ, 2nd T20I: केवळ शंभर धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला ६ गड्यांनी नमवले.

केवळ शंभर धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला ६ गड्यांनी नमवले. मात्र, हे विजयी लक्ष्य गाठणाऱ्या भारतीयांनी केवळ एक चेंडू राखून कसाबसा विजय मिळवला. या विजयासह भारतीयांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी महत्त्वपूर्ण बरोबरीही साधली.

या सामन्यात एकही षटकार मारला गेला नाही, हे विशेष तसेच, भारताकडून सूर्यकुमार यादवने केलेल्या नाबाद २६ धावा सामन्यातील सर्वाधिक धावांची खेळी ठरली. तसेच या खेळीसाठी सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मात्र ३१ चेंडूत फक्त २६ धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार का देण्यात आला?, यामागील कारण काय असले?, असे प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. परंतु सूर्यकुमार शेवटच्या षटकापर्यंत सांभाळून खेळल्याने त्याला हा पुरस्कार देण्यात आला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला भारताने २० षटकांत ८ बाद २९ धावांवर रोखले. मात्र, हे 'माफक' लक्ष्य भारतीयांनी १९.५ षटकांत ४ बाद १०१ धावा करून पार केले. लक्ष्याचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केलेल्या भारताचा डाव नवव्या षटकापासून मंदावला.

शुभमन गिल (११), इशान किशन (१९) चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाले आणि राहुल त्रिपाठी (१३) व वॉशिंग्टन सुंदर (१०) हेही चांगल्या स्थितीतून परतले. त्यातही किशन आणि सुंदर सहकारी फलंदाजासह उडालेल्या गोंधळामुळे धावबाद झाल्याने सामन्याला कलाटणी मिळाली.

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी पुन्हा एकदा अखेरपर्यंत नाबाद राहत पाचव्या गड्यासाठी नाबाद ३१ धावांची भागीदारी केली. यामुळे भारताचा विजय साकारला गेला. सूर्यकुमारने ३१ चेंडूंत एका चौकारासह नाबाद २६, तर हार्दिकने २० चेंडूंत एका चौकारासह नाबाद १५ धावा केल्या.

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी पुन्हा एकदा अखेरपर्यंत नाबाद राहत पाचव्या गड्यासाठी नाबाद ३१ धावांची भागीदारी केली. यामुळे भारताचा विजय साकारला गेला. सूर्यकुमारने ३१ चेंडूंत एका चौकारासह नाबाद २६, तर हार्दिकने २० चेंडूंत एका चौकारासह नाबाद १५ धावा केल्या.

अर्शदीप सिंगने २ षटकांमध्ये केवळ ७ धावा देत २ बळी घेतले. हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक हूडा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. न्युझीलंडकडून कर्णधार मिशेल सँटनरने सर्वाधिक नाबाद १९ धावा काढताना २३ चेंडूंत एक चौकार मारला.