Join us  

IND vs NZ, 2nd Test Live Update : विश्वविक्रम एजाझ पटेलचा पण नाव राहुल द्रविडचं चर्चेत, जाणून घ्या त्यामागची मजेशीर आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 2:39 PM

Open in App
1 / 8

India vs New Zealand, 2nd Test Live Update : किवी गोलंदाज एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) आज स्पेशल क्लबमध्ये स्थान पटकावले. मुंबईत जन्मलेल्या एजाझनं वानखेडेवर टीम इंडियाचा पहिला डाव एकट्यानं गुंडाळला. त्यानं ११९ धावा देताना १० विकेट्स घेतल्या आणि कसोटीच्या एका डावात असा पराक्रम करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्या क्लबमध्ये एजाझचं नाव दाखल झालं आहे.

2 / 8

२१ ऑक्टोबर १९८८मध्ये मुंबईत जन्मलेला एजाझ ८ वर्षांचा असताना कुटुंबीयांनी न्यूझींलड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आज ३४ वर्षीय एजाझनं जन्मभूमीत दहा विकेटस घेत मोठा विक्रम केला. प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर असा पराक्रम करणारा एजाझ हा जगातला पहिलाच फलंदाज आहे.

3 / 8

इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेनं १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यानं १२ निर्धाव षटकंही फेकली.

4 / 8

कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्धची डावातील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी १९७१मध्ये जॅक नॉरेगा ( वेस्ट इंडीज) यांनी ९५ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ फ्रेड ट्रूमन ( ८- ३१, १९५२), लान्स गिब्स ( ८-३८, १९६२) व नॅथन लियॉन ( ८-५०, २००७) यांचा क्रमांक येतो.

5 / 8

प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील एजाझची ही कामगिरी सर्वोत्तम ठरली. यापूर्वी हा विक्रम जॉर्ज लोहमन यांनी १८९६मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रिचर्ड हेडली ( ९-५२ वि. ऑस्ट्रेलिया, १८९५), मुथय्या मुरलीधरन ( ९-६५ वि. इंग्लंड, १९९८) व सर्फराज नवाझ ( ९-८६ वि. ऑस्ट्रेलिया, १९७९) यांचा क्रमांक येतो.

6 / 8

कसोटी क्रिकेटमधील ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५३ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर अनिल कुंबळे यांनी १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध ७४ धावांत १० विकेट्स घेतल्या. आज एजाझनं ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या.

7 / 8

जन्मभुमीत गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. एजाझचा जन्म हा मुंबईचा आणि त्यानं इथेच १० विकेट्स घेतल्या. यापूर्वी मुथय्या मुरलीधरन यानं २००२मध्ये कँडी येथे ५१ धावांत ९ विकेट्स, व अब्दुल कादीर यांनी १९८७ मध्ये लाहोर येथे ५६ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या.

8 / 8

एजाझच्या या विक्रमानं राहुल द्रविड व जवागल श्रीनाथ यांच्या नावावर एक वेगळा विक्रम नोंदवला गेला. द्रविड व श्रीनाथ हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या १० विकेट्सच्या इतिहासाचे साक्षीदार ठरले आहेत. २०००-०१मध्ये देबाशिष मोहांतीनं आगरताला येथे ४६ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या, तेव्हा द्रविड व श्रीनाथ यांच्या विकेटचा त्यात समावेश होता. त्यानंतर १९९९मध्ये कुंबळेनं पाकिस्तानला इंगा दाखवला तेव्हा द्रविड व श्रीनाथ हे टीम इंडियाचे सदस्य होते आणि आज द्रविड मुख्य प्रशिक्षक आहे व श्रीनाथ मॅच रेफरी आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडन्यूझीलंडअनिल कुंबळेराहुल द्रविडएजाझ पटेल
Open in App