एजाझनं आज दोन विकेट्स घेताच न्यूझीलंडकडून एकाच कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांत त्यानं चौथे स्थान पटकावलं. सर रिचर्ड हॅडली ( १५-१२३ वि. ऑस्ट्रेलिया, १९८५), डॅनिएल व्हिटोरी ( १२-१४९ वि. ऑस्ट्रेलिया, २०००) व डॅनिएल व्हिटोरी ( १२-१७० वि. बांगलादेश, २००४) यांच्यानंतर आता एजाझ पटेल ( १२-१८७*) याचा क्रमांक येतो.
भारताविरुद्ध एकाच कसोटीत १२ विकेट्स घेणारा एजाझ हा पहिलाच किवी गोलंदाज ठरला. यापूर्वी रिचर्ड हॅडली यांनी १९७६मध्ये वेलिंग्टन कसोटीत ११ व मुंबई कसोटीत १० विकेट्स घेतल्या होत्या.
श्रेयसच्या विकेटनं एजाझनं आणखी विक्रम नावावर केले. भारतात एकाच कसोटीत सर्वाधिक १३ विकेट्स घेणारा तो यशस्वी परदेशी फिरकीपटू ठरला. यापूर्वी स्टीव ओ'किफनं २०१७मध्ये १२ व जेसन क्रेझानं २००८मध्ये प्रत्येकी १२ विकेट्स घेतल्या होत्या.
सर इयान बॉथम ( १३-१०६ वि. भारत , १९८०), नॅथन लियॉन ( १३-१५४ वि. बांगलादेश, २०१७) यांच्यानंतर आशियाई देशात १३ विकेट्स घेणारा एजाझ हा तिसरा नॉन आशियाई गोलंदाज ठरला. बॉथम यांनी वानखेडे स्टेडियमवरच हा पराक्रम केला होता.
एजाझनं १४ विकेट्स घेताच तो न्यूझीलंडकडून कसोटी सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज ठरला. १९८५ मध्ये रिचर्ड्स हॅडली यांनी एका सामन्यात १५ विकेट्स घेतल्या होत्या.
भारतीय भूमितील ही पाचवी सर्वोत्तम कामगिरी ठरली. या विक्रमात नरेंद्र हिरवाणी ( 16/136 vs WI at Chennai, 1988), हरभजन सिंग ( 15/217 vs Aus at Chennai, 2001), जसूभाई पटेल ( 14/124 vs Aus at Kanpur, 1959), अनिल कुंबळे ( 14/149 vs Pak at Delhi, 1999) आणि एजाझ पटेल ( 14/225 at Mumbai, 2021*) अशी क्रमवारी येते.