Join us  

IND vs NZ, 3rd ODI Live : ३ वर्षांनंतर रो'हिट' शर्माने वन डेत शतक झळकावले, शुभमन गिलसह वादळी खेळी करत अनेक विक्रम मोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 3:29 PM

Open in App
1 / 9

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्माने अखेर ५१ आंतरराष्ट्रीय डावांतील शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने आणि शुभमन गिल या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी यथेच्छ धुलाई केली. शुभमन गिल फॉर्मात होताच, परंतु सर्वांचे लक्ष रोहितच्या शतकाकडे लागले होते. दोघं इतके सुसाट खेळत होते की पहिले शतक कोण पूर्ण करतं अशी जणू शर्यतच त्यांच्यात लागली होती. रोहितने ३ वर्षांनंतर वन डेत शतक झळकावले आणि त्यापाठोपाठ गिलनेही शतक पूर्ण केले

2 / 9

भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना हा भारताला आयसीसी वन डे क्रमवारीत नंबर वन बनवण्यासाठी महत्त्वाचा आहे. न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने संघात दोन बदल केले आहेत. उम्रान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या जागी संघात स्थान मिळाले आहे.

3 / 9

रोहित शर्माचा हा ४३५ वा आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि त्याने मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले. सचिन तेंडुलकरने भारताकडून सर्वाधिक ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( ५३५), राहुल द्रविड ( ५०४) व विराट कोहली ( ४९०) यांचा क्रमांक येतो. आजच्या सामन्यात रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ७८ चेंडूंत शतकी आकडा फलकावर चढवला.

4 / 9

गिलने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर रोहितनेही षटकारांची आतषबाजी करताना ४९वे अर्धशतक झळकावले. भारताकडून सर्व फॉरमॅटमध्ये मिळून रोहितची ही शंभरावी ५०+ धावांची खेळी ठरली. यापूर्वी सचिन तेंडुलकर ( १२०), सुनील गावस्कर ( १०१) व वीरेंद्र सेहवाग ( १०१ ) यांनी असा पराक्रम केला आहे.

5 / 9

रोहितने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत तिसरे स्थान पटकावले. शाहिद आफ्रिदी ३५१ आणि ख्रिस गेल ३३१ षटकारांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने आज २७३* वा षटकार खेचला अन् सनथ जयसूर्याचा ( २७०) विक्रम मोडला. रोहितने पुलशॉट/हुक मारून वन डेत सर्वाधिक २६० वेळा चेंडू ( १५२ चौकार व १०८ षटकार) सीमापार पाठवला.

6 / 9

शुभमन गिलनेही तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने या मालिकेत ३१४+ धावा करताना विराट कोहलीचा ( २८३ धावा वि. श्रीलंका, २०२३) विक्रम मोडला. रोहित शर्मा व शुभमन गिल यांची २०६ धावांची भागीदाही ही न्यूझीलंडविरुद्ध भारतीयांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली.

7 / 9

रोहित शर्मा ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर बाद झाला. वन डे क्रिकेटमधील हे त्याचे ३०वे शतक ठरले अन् त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगच्या शतकांशी बरोबरी केली. सचिनच्या नावावर सर्वाधिक ४९ व विराटच्या नावावर ४६ शतकं आहेत.

8 / 9

शुभमन गिल ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर माघारी परतला.

9 / 9

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माशुभमन गिल
Open in App