Join us  

IND vs NZ, 3rd ODI Live : रोहित शर्मा-शुभमन गिल यांनी नोंदवले असे ६ विक्रम, ज्यांनी भल्याभल्या दिग्गजांना टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 5:52 PM

Open in App
1 / 7

रोहित ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर शुभमन ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर माघारी परतला

2 / 7

रोहित आणि शुभमनने 212 धावांची सलामी भागीदारी केली. न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. या दोघांनी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा 2009 मध्ये नाबाद 201 धावांचा विक्रम मोडला.

3 / 7

रोहित आणि शुभमनच्या भागीदारीची धावगती 8.10 इतकी होती आणि किमान 25 षटकांतील भारतीय फलंदाजांची सर्वोच्च धावगती आहे. या दोघांनी 2002 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 7.35 धावांची भागीदारी करणाऱ्या सौरव गांगुली-वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6.72 च्या धावगतीने भागीदारी केली होती.

4 / 7

शुभमन गिलने 21 डावात चार एकदिवसीय शतके झळकावली आणि हा पराक्रम करणारा सर्वात जलद भारतीय ठरला. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडला. त्याने 24 डावात हा टप्पा गाठला. त्याच्यानंतर केएल राहुल (३१ डाव), विराट कोहली (३३ डाव) यांची नावे येतात.

5 / 7

रोहित शर्माने त्याच्या शतकी खेळीत सहा षटकार ठोकले. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही 15वी वेळ आहे जेव्हा त्याने एका डावात किमान पाच षटकार मारले आहेत. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरचे नाव येते, ज्याने आठ वेळा एका डावात किमान पाच षटकार मारले होते. सौरव गांगुली (सात), युवराज सिंग-एमएस धोनी आणि विराट कोहली (चार) हे उर्वरित भारतीय आहेत.

6 / 7

रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात 10व्यांदा भारतासाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. तो फक्त विराट कोहलीच्या मागे आहे ज्याने 13 वेळा अशी भागीदारी केली आहे. रोहित आणि कोहली पेक्षा जास्त, जगातील कोणत्याही फलंदाजाला वनडेमध्ये २०० किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी करता आलेली नाही.

7 / 7

ओपनर म्‍हणून वनडेमध्‍ये सर्वाधिक शतके झळकावणा-या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्मा संयुक्‍तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सलामीवीर म्हणून हे त्याचे 28 वे वनडे शतक होते. त्याने 27 शतके झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाला मागे टाकले. रोहितशिवाय सनथ जयसूर्याच्या नावावरही २८ शतके आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर (४५) पुढे आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माशुभमन गिल
Open in App