ind vs nz 3rd test match third test match between India and New Zealand will be held in Mumbai
Cricket Buzz»फोटो गॅलरी »IND vs NZ : सलग दोन पराभवांमुळे भारताची 'कसोटी'! मुंबईतील सामन्यातून ३ बड्या खेळाडूंना डच्चू?IND vs NZ : सलग दोन पराभवांमुळे भारताची 'कसोटी'! मुंबईतील सामन्यातून ३ बड्या खेळाडूंना डच्चू? By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 4:12 PMOpen in App1 / 9सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. पहिल्या दोन कसोटीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. 2 / 9अशाप्रकारे न्यूझीलंडने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. आता उभय संघांमधील तिसरी कसोटी १ नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 3 / 9त्याचबरोबर या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया आपल्या अनेक बड्या खेळाडूंशिवाय मुंबई कसोटीत उतरू शकते. तिसऱ्या कसोटीसाठी रवी अश्विन किंवा रवींद्र जडेजा यापैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे.4 / 9याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच वेगवान गोलंदाज आकाश दीपला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 5 / 9मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, मुंबई कसोटीसाठी भारताचा संघ काय आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.6 / 9या मालिकेबद्दल भाष्य करायचे झाले तर, पहिली कसोटी बंगळुरूमध्ये खेळली गेली. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. 7 / 9यानंतर मालिकेतील दुसरी कसोटी पुण्यात खेळवण्यात आली. यावेळी किवी संघाने भारताचा ११३ धावांनी पराभव केला. अशाप्रकारे किवी संघाने ३ कसोटी सामन्यांची मालिका जिंकली.8 / 9दरम्यान, यजमान संघाने मालिका गमावली असली तरी मुंबईतील एकमेव सामना जिंकून आपल्या घरच्या चाहत्यांना सुखद धक्का देण्यासाठी टीम इंडिया मैदानात असेल.9 / 9मुंबई कसोटी जिंकून भारतीय संघ क्लीन स्वीप टाळणार का हे पाहण्याजोगे असेल. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात यजमानांची अग्निपरीक्षा असेल हे नक्की. आणखी वाचा Subscribe to Notifications