पंतसह टीम इंडियातील ३ चेहरे... जे एकही मॅच न खेळता ठरले चॅम्पियन!

या तिघांना पाच पैकी एकाही सामन्यात मिळाली नाही संधी, तरी....

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं दिमाखदार कामगिरी करत एकही सामना न गमावता २०२५ च्या हंगामातील नवव्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर विक्रमी तिसऱ्यांदा नाव कोरले.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूच्या हिरोगिरीमुळे टीम इंडियानं १३ वर्षांचा दुष्काळ संपवत एकदिवसीय प्रकारातील आयसीसी ट्रॉफी जिंकली.

श्रेयस अय्यर (२४३ धावा) आणि विराट कोहली (२१८ धावा) यांनी भारताकडून सर्वाधिक धावा केल्या.

गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी याने प्रत्येकी ९-९ विकेट्स घेत गोलंदाजीत कमाल दाखवली.

विकेट किपर बॅटरच्या रुपात पहिली पसंती देण्यात आलेल्या लोकेश राहुलनंही आपल्या अंदाजात फटकेबाजी करत संघ व्यवस्थापनाना विश्वास सार्थ ठरवला. त्याला ज्या पंतच्या जागी खेळवण्यात आले त्याच्याशिवाय टीम इंडियात ३ चेहरे असे आहेत ज्यांना एकही मॅच न खेळता चॅम्पियनचा टॅग लागला. एक नजर त्या खेळाडूंवर

रिषभ पंतला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकही सामना खेळता आला नाही. पण तोही २०२५ च्या हंगामातील चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग असल्यामुळे त्यालाही चॅम्पियन्सचा टॅग मिळाला. प्रतिष्ठीत व्हाइट ब्लेझर घालून मिरवण्याची संधी त्याला मिळाली.

अर्शदीप सिंगलाही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळाले, पण त्यालाही एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.