IND Vs NZ: जागा दोन, दावेदार पाच, कुणाला निवडणार? न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी हार्दिक पांड्याचं वाढलं टेन्शन

IND Vs NZ 1st T20I: टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या निराशेनंतर भारतीय संघ अनेक सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आहे. तिथे तीन टी-२० सामन्यातील पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. मात्र त्या सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पांड्या आणि संघव्यवस्थापनासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या मालिकेत सलामीसाठी कोण जाणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे त्याचं कारण म्हणजे सलामीवीरांच्या दोन जागांसाठी एकूण ५ दावेदार समोर येत आहेत.

टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या निराशेनंतर भारतीय संघ अनेक सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आहे. तिथे तीन टी-२० सामन्यातील पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. मात्र त्या सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पांड्या आणि संघव्यवस्थापनासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या मालिकेत सलामीसाठी कोण जाणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे त्याचं कारण म्हणजे सलामीवीरांच्या दोन जागांसाठी एकूण ५ दावेदार समोर येत आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी शुभमन गिल हा सलामीवीर म्हणून भारतीय संघाची पहिली पसंती असू शकतो. शुभमन गिलने गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी खूप चांगले योगदान दिलेले आहे.

रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत डावखुरा फलंदाज ईशान किशन सलामीसाठी एक पर्याय असू शकतो. ईशानने अनेक सामन्यात भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.

भारतीय संघातील यष्टीरक्षक ऋषभ पंत हासुद्धा या टी-२० मालिकेत सलामीवीर म्हणून पर्याय ठरू शकतो. पंतला सलामीला पाठवण्याची मागणी अनेक दिग्गजांनी केली आहे. मात्र ऋषभ पंत सलामीवीर म्हणून आतापर्यंत फार समाधानकारक कामगिरी करू शकलेला नाही.

यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसुद्धा भारतीय संघासाठी या मालिकेत सलामीचा पर्याय आहे. संजूने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून काही चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यामुळे संघव्यवस्थापन त्याचा पर्यायही आजमावू शकते.

टीम इंडियातील स्टार फलंदाज दीपक हुड्डासुद्धा सलामीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्याने वरच्या फळीत फलंदाजी करताना एक शतकी खेळी केलेली आहे.