Join us  

"एवढ्या सहज षटकार कसा मारतोस", पंचांनी प्रश्न विचारताच रोहितनं दाखवली 'पॉवर', हिटमॅननं सांगितला थरार

By ओमकार संकपाळ | Published: October 15, 2023 7:43 PM

Open in App
1 / 10

सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. शनिवारी भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला १९१ धावांत सर्वबाद केले. यानंतर टीम इंडियाने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करत सामना जिंकला.

2 / 10

भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने ६३ चेंडूत ८६ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकार मारले.

3 / 10

खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यादरम्यान एक नाट्यमय घडामोड घडली. पाकिस्तानच्या गोलंदाजांना सहज षटकार ठोकून शेजाऱ्यांची डोकेदुखी वाढवणाऱ्या रोहितने पंचांना देखील आपलेसे केले.

4 / 10

रोहितला पाहून पंचांनी एक भन्नाट प्रश्न विचारला. 'एवढ्या सहज षटकार कसा मारतोस? बॅटमध्ये काय आहे का?' असे पंचांनी विचारताच रोहितने पॉवर दाखवली.

5 / 10

रोहित शर्मा पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध सहज षटकार आणि चौकार मारत होता.

6 / 10

यानंतर मैदानावरील पंचांनी रोहित शर्माला विचारले, तू एवढ्या सहजपणे इतके लांब षटकार कसे मारतोस? तुझ्या लांबलचक षटकारामागे बॅटचे काही रहस्य आहे का? यानंतर भारतीय कर्णधाराने हसत हसत पंचांना उत्तर दिले की, यामागचे कारण बॅट नसून पॉवर आहे. यानंतर पंचांना देखील हसू आवरले नाही.

7 / 10

भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी विश्वचषकाची सुरुवात चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

8 / 10

मात्र, त्यानंतर रोहित शर्माने शानदार पुनरागमन केले. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध ८४ चेंडूत १३१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १६ चौकार आणि ५ षटकार मारले. याशिवाय रोहितने पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी केली.

9 / 10

शनिवारी पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही.

10 / 10

गिल बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्या