IND vs SA 2nd ODI Live Updates : 'थ्री इडियट्स'च्या फरहानसारखी Shahbaz Ahmedची स्टोरी; जाणून घ्या इंजिनियर कसा बनला क्रिकेटर...

India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वन डेत दोन्ही संघात बदल पाहायला मिळतोय. आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघातही दोन बदल पाहायला मिळत आहेत. अष्टपैलू शाहबाज अहमदने आज पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेम्बा बवुमा आज खेळणार नाही, तर केशव महाराज नाणेफेकीला आला आहे. टेम्बासह तब्रेझ शम्सी आज खेळणार नाही. ऋतुराज व बिश्नोई यांच्या जागी आत वॉशिंग्टन सुंदर व शाहबाज यांना संधी दिली गेली आहे.

हरयाणातील मेवात जिल्हात राहणाऱ्या शाहबाजचा क्रिकेटप्रवास रोमांचक आहे. शाहबाजचे वडील अहमद जान हे हरयाणात एसडीएसचे रिडर आहेत. मुलांचे शिक्षण व नोकरी साठी त्यांनी गाव सोडले. मुलाने इंजिनियर बनावे हे त्यांचे स्वप्न होते, परंतु तसे झाले नाही. त्याला क्रिकेपटू बनायचे होते.

शाहबाजच्या आजोबांना क्रिकेटचं वेड होतं, परंतु तेव्हा मेवात येथे क्रिकेटच्या सुविधाच नव्हत्या. मेवात हे गाव शिक्षणासाठी ओळखतं जातं. जिथे डॉक्टर व इंजिनियर्सची संख्या अधिक आहे. शाहबाजची लहान बहिण फहरीन डॉक्टर आहे आणि फरीदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये सराव करतेय. शाहबाजने इंजिनियर बनावे यासाठी त्याच्या वडिलांनी त्याचं अॅडमिशन फरीदाबादच्या कॉलेजमध्ये केले होते.

इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शाहबाजचं अॅडमिशन तर झाले, परंतु त्याचे मन शिक्षणात लागे ना... क्रिकेटसाठी तो क्लास सोडायचा. याची खबर वडिलांना झाली आणि त्यांनी शाहबाजसमोर क्रिकेट की इंजिनियरिंग यापैकी एकाची निवड करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर त्यांनी शाहबाजला क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली.

शाहबाज गुडगांव येथील क्रिकेट अकादमीत सराव करू लागला आणि क्रिकेटसोबत त्याने शिक्षणही सुरू ठेवले. त्याने इंजिनियरिंगही पूर्ण केली. त्यांतर तो बंगालमध्ये गेला आणि तेथील एका क्लबकडून खेळू लागला. शाहबाजने २०१८-१८च्या स्थानिक क्रिकेट हंगामात चांगली कामगिलरी केली आणि त्यानंतर त्याची बंगालच्या रणजी संघात निवड झाली. २०१९-२०मध्ये तो भारत अ संघाकडून खेळला.

शाहबाजने १९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११०३ धावा व ६२ विकेट्स, २७ लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६६२ धावा व २४ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त ५६ सामन्यांत ५१२ धावा व ३९ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो... नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० मालिकेत तो भारतीय संघाचा सदस्य होता आणि रोहित शर्माने जेतेपदाचा चषक त्याच्या हाती दिला होता.