Join us  

IND vs SA, 2nd Test, Virat Kohli Record : राहुल द्रविडला आहे विश्वास; विराट कोहली दुसरी कसोटी गाजवणार, लय भारी विक्रम नोंदवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 5:57 PM

Open in App
1 / 8

IND vs SA, 2nd Test, Virat Kohli Record : विराट कोहलीचा नेट्समध्ये जो सराव सुरू आहे, तो पाहता त्याच्या बॅटीतून लवकरच मोठी खेळी पाहायला मिळेल, असा विश्वास टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडनं व्यक्त केला आहे. सोमवारपासून सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कॅप्टन विराटला अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे...

2 / 8

IND vs SA, 2nd Test, Virat Kohli Record : भारतीय संघानं पहिल्या कसोटीत ११३ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियानं जोहान्सबर्ग कसोटीही जिंकल्यास विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार स्टीव्ह वॉ याच्या विक्रमाशी बरोबरी करेल.

3 / 8

विराट कोहलीनं दुसरी कसोटी जिंकताच कर्णधार म्हणून त्याच्या नावावर ४१ विजयांची नोंद होईल. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ ५३ विजयांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग ( ४८), स्टीव्ह वॉ ( ४१) आणि विराट ( ४०) यांचा क्रमांक येतो.

4 / 8

उद्याच्या लढतीत ७ धावा करताच विराटच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला जाणार आहे. वंडरर्स येथे परदेशी फलंदाजानं केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम विराटच्या नावावर होईल. सध्या हा विक्रम न्यूझीलंडचे जेआर रेड यांच्या नावावर आहे. त्यांनी १९६१-६२ या कालावधीत वंडरर्सवर ३१६ धावा केल्या होत्या. विराटच्या नावावर ३१० धावा आहेत. पाँटिंग ( २६३), राहुल द्रविड ( २६२) व डॅनिएल मार्टिन ( २५५) हे टॉप फाईव्ह मध्ये आहेत.

5 / 8

विराट कोहलीला कसोटीत ८००० धावा पूर्ण करण्यासाठी १४६ धावांची गरज आहे. कसोटीत ८ हजार धावा करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरले.

6 / 8

अजिंक्य रहाणेलाही कसोटीत ५००० धावा पूर्ण करण्यासाठी १३७ धाव कराव्या लागतील. रहाणेनं दुसऱ्या कसोटीत १३ धावा करताच तो महेंद्रसिंग धोनीला ( ४८७६) मागे टाकेल.

7 / 8

भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत यानं चार झेल टिपताच तो कसोटीत झेलचे शतक पूर्ण करणारा चौथा भारतीय यष्टिरक्षक ठरले. महेंद्रसिंग धोनी ( २५६), सय्यद किरमानी ( १६०) व किरण मोरे ( ११०) हे या विक्रमात आघाडीवर आहेत. सेंच्युरियन कसोटीत रिषभनं कसोटीत सर्वात जलद १०० बळी घेण्याचा विक्रम नोंदवला. त्यानं २६ कसोटींत हा पराक्रम करताना धोनीचा ( ३६ कसोटी) विक्रम मोडला.

8 / 8

आर अश्विनला कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांत दुसऱ्या क्रमांकावर सरकण्यासाठी केवळ ५ विकेट्स घ्यावा लागतील. तो ४२९ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर कपिल देव यांच्या नावावर ४३४ विकेट्स आहेत. अनिल कुंबळेनं ६१९ विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीराहुल द्रविडरिषभ पंतआर अश्विन
Open in App