IND vs SA, 2nd Test Live Updates : २४० धावा विजयासाठी आहेत का पुरेशा?; दक्षिण आफ्रिकेला इतिहास घडवण्याची संधी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी

India vs South Africa, 2nd Test Live Updates : अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर हनुमा विहारीच्या नाबाद ४० आणि शार्दूल ठाकूरच्या २८ धावांच्या जोरावर भारतानं दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर गडगडला.

India vs South Africa, 2nd Test Live Updates : अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर हनुमा विहारीच्या नाबाद ४० आणि शार्दूल ठाकूरच्या २८ धावांच्या जोरावर भारतानं दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर गडगडला.

कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी व मार्को जॅन्सेन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. पण, टीम इंडिया २४० धावांचा यशस्वी बचाव करू शकते का?, दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पेलवेल का?, असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात आहेत.

भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गडगडला. शार्दूल ठाकूर यानं मंगळवारी इतिहास घडवला. जोहान्सबर्ग कसोटी त्यानं एका डावात ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. शार्दूलनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या.

भारताच्या दुसऱ्या डावात लोकेश ( ८ ) व मयांक ( २३ ) यांना अनुक्रमे मार्को जॅन्सेन व ऑलिव्हर यांनी बाद केले. चेतेश्वर पुजारानं ८६ चेंडूंत ५३ आणि अजिंक्य रहाणेनं ७८ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. रिषभ पंत चुकीचा फटका मारून शून्यावर बाद झाला. आर अश्विन व शार्दूल ठाकूर यांनी फलंदाजीत योगदान देताना अनुक्रमे १६ व २८ धावा केल्या.

हनुमा विहारी एका बाजूनं विकेट टिकवून खेळला, परंतु भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेला विजयासाठी २४० धावा करायच्या आहेत.

२०१८मध्ये याच मैदानावर भारतानं ६३ धावांनी विजय मिळवला होता आणि त्याहीवेळेस आफ्रिकेसमोर विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ठेवले होते. पण, हा इतिहास आफ्रिका बदलणार का? की २०१८चा करिष्मा करताना ऐतिहासिक मालिका विजयावर टीम इंडिया शिक्कामोर्तब करेल?

जोहान्सबर्गवर चौथ्या डावात यशस्वी पाठलाग करण्यात ऑस्ट्रेलिया अग्रक्रमांकावर आहे. त्यांनी २०११ मध्ये ८ बाज ३१० धावा करून विजय मिळवला होता. त्याआधी २००६मध्ये त्यांची ८ बाद २९४ धावा करून बाजी मारली. यजमान आफ्रिकेबाबत विचाराल तर त्यांनी २००६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या डावात ६ बाद २२० धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतानं उभं केलेलं आव्हान पेलवणं सोपं नक्की नाही.

भारतानं हा विजय मिळवल्यास कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा त्यांचा दुसरा सर्वात निचांक यशस्वी बचाव असेल. यापूर्वी १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी मेलबर्न कसोटीत १४३ धावांचा यशस्वी बचाव केला होता.