Join us  

IND vs SA, 2nd Test Live Updates : लोकेश राहुलमुळे भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये १३ वर्षांनंतर घडला चमत्कार, कर्नाटकच्या खेळाडूनं लावली विक्रमांची रांग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 4:55 PM

Open in App
1 / 5

India vs South Africa, 2nd Test Live Updates : पाच महिन्यांपूर्वी लोकेश राहुल हा टीम इंडियाचा कर्णधार बनेल, असे कुणी सांगितले असते तर त्यावर विश्वासच ठेवला नसता. कसोटी संघातील स्थान डळमळीत असताना लोकेशला इंग्लंड दौऱ्यावर मयांक अग्रवालच्या फॉर्ममुळे संधी मिळाली आणि आज तो टीम इंडियाचे नेतृत्व करतोय.

2 / 5

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीची पाठ दुखली अन् त्यानं खेळण्यास नकार दिला. रोहित शर्माही संघात नसल्यामुळे लोकेश राहुलकडे कर्णधारपद गेले. टीम इंडियाचे आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर लोकेश जबाबदारीनं खेळताना दिसतोय.

3 / 5

कर्णधारपदाच्या जबाबदारीसह लोकेशनं आज अनेक विक्रमांची बरोबरी केली. त्यानं मोहम्मद अझरुद्दीन व सुनील गावस्कर यांच्याशी बरोबरी केली. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद न भूषवता थेट कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळणारा लोकेश हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी १९९०मध्ये मोहम्मद अझरुद्दीननं हा पराक्रम केला होता. त्याआधी सुनील गावस्कर, बिशनसिंग बेदी आणि अजित वाडेकर यांनीही हा विक्रम केला आहे.

4 / 5

१३ वर्षांनंतर कर्नाटकच्या खेळाडूला कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी १९८०मध्ये गुंडप्पा विश्वनाथन, २००३ ते २००७ राहुल द्रविड आणि २००७-०८ अनिल कुंबळे यांनी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविले होते. यापैकी द्रविडनं सर्वाधिक २५ सामन्यांत नेतृत्व सांभाळले.

5 / 5

सर्वात कमी फर्स्ट क्लास सामन्यांत नेतृत्व सांभाळून थेट टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये लोकेश राहुलनं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी बरोबरी केली आहे. धोनीकडेही एकाच प्रथम श्रेणी सामन्यात नेतृत्व करण्याचा अनुभव होता. अजिंक्य रहाणेकडे मात्र एकाही प्रथम श्रेणी सामन्यात नेतृत्व करण्याचा अनुभव नसूनही तो राष्ट्रीय संघाचा कर्णधार झाला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुल
Open in App