Join us  

IND vs SA, 2nd Test Live Updates : शंभर वर्षात जे फक्त एकालाच जमलं होतं, ते आता शार्दूल ठाकूरनंही करून दाखवलं, केली अनेक दिग्गजांची विक्रम मोडणारी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 8:15 PM

Open in App
1 / 8

India vs South Africa, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी गाजवली. भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ मोठी धावसंख्या उभारेल असे चिन्ह दिसत होते. पण, शार्दूलनं महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

2 / 8

डीन एल्गनर, किगन पीटरसन, टेम्बा बवुमा या महत्त्वाच्या खेळाडूंसह शार्दूलनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या आणि आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गुंडाळला. आफ्रिकेनं पहिल्या डावात नाममात्र २७ धावांची आघाडी घेतली. या कामगिरीसह शार्दूलनं मोठमोठे विक्रम मोडले.

3 / 8

दक्षिण आफ्रिकेत एकाच डावात ७ विकेट्स घेणारा शार्दूल हा पहिलाच आशियाई जलदगती गोलंदाज ठरला. यापूर्वी हरभजन सिंगनं १२० धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. वंडरर्सवर २९ वर्षांपूर्वीचा अनिल कुंबळेचा विक्रम शार्दूलनं मोडला. येथे १९९२-९३मध्ये कुंबळेनं ५३ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

4 / 8

दक्षिण आफ्रिकेतील ही भारतीय गोलंदाजाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शार्दूलनं ६१ धावांत ७ विेकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर हरभजन सिंग ( 7/120 at Cape Town, 2011), अनिल कुंबळे ( 6/53 at Johannesburg, 1992), जावगल श्रीनाथ ( 6/76 at Port Elizabeth, 2001) आणि रवींद्र जडेजा ( 6/138 at Durban, 2013) यांचा विक्रम मोडला.

5 / 8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटीतील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१५मध्ये आर अश्विननं ६६ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापाठोपाठ हरभजन सिंग ( 7/87, 2004), आर अश्विन ( 7/145, 2019) असा क्रमांक येतो.

6 / 8

चौथा गोलंदाज म्हणून संघात खेळणाऱ्या गोलंदाजांमधीलही सर्वोत्तम कामगिरी ठरली. १९८१मध्ये कपिल देव यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 5/28 - Hardik Pandya v ENG, 2018 व 4/29 - Vijay Hazare v AUS, 1947 यांचा विक्रम येतो.

7 / 8

दक्षिण आफ्रिकेतील मागील १०० वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील इतिहासात आतापर्यंत केवळ एकाच पाहुण्या जलदगती गोलंदाजाला ७ विकेट्स घेता आल्या होत्या. १९९९मध्ये इंग्लंडच्या अँड्य्रू कॅडिकनं डर्बन कसोटीत ४६ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर शार्दूलनं हा पराक्रम केला.

8 / 8

शार्दूलनं ६८ चेंडूंत पाच विकेट्स घेतल्या. सध्याच्या संघातील जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्यानंतर जोहान्सबर्गवर डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम शार्दूलनं केला. येथे डावात पाच विकेट्स घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ( १९९२), जावगल श्रीनाथ ( १९९७), एस श्रीसंथ ( २००६) यांनीही हा पराक्रम केला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशार्दुल ठाकूर
Open in App