Join us  

संजू सॅमसन-तिलक वर्मा यांनी मोडला २० वर्षांपूर्वीचा विक्रम; वाचा भारताचे ५ मोठे पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 9:06 PM

Open in App
1 / 5

संजू सॅमसनने ( Sanju Samson Century) शतक झळकावून भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. तिलक वर्मा व लोकेश राहुल यांनी संजूला दमदार साथ दिली. संजूने कर्णधार लोकेश राहुलसह ( २१) ५२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर संजू व तिलक वर्मा यांनी ११६ धावांची भागीदारी केली.

2 / 5

तिलक ७७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांवर बाद झाला. संजूने ११४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर ( १४ ) व अक्षर पटेल( १) मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. रिंकू सिंग ( २७ चेंडूंत ३८ धावा) व अर्शदीप सिंग ( २ चेंडूंत ७ धावा) यांनी शेवटपर्यंत खेळ करून संघाला ८ बाद २९६ धावांपर्यंत पोहोचवले.

3 / 5

बोलंड पार्क येथील प्रथम फलंदाजी करताना ८ संघांनी २५० हून अधिक धावा उभ्या केल्या आणि त्यापैकी एकदाच लक्ष्याचा यशस्वी पाठलाग झाला आहे. २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताच्या ६ बाद २८७ धावांचा ७ विकेट्स राखून पाठलाग केला.

4 / 5

संजू सॅमसन व तिलक वर्मा यांनी आज ११६ धावांची भागीदारी केली. चौथ्या विकेटसाठी वन डे क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. मोहम्मद कैफ व दिनेश मोंगिया ( २००३, ढाका) यांच्या ११०* धावांच्या भागिदारीचा विक्रम आज मोडला गेला. विराट कोहली व सुरेश रैना यांनी २०१५ मध्ये चेन्नईत १२७ धावा केल्या होत्या.

5 / 5

भारताने आज ८ बाद २९६ धावा केल्या आणि भारताची दक्षिण आफ्रिकेतील चौथी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. २००१मध्ये केन्याविरुद्ध ३ बाद ३५१ धावा, २००३ वर्ल्ड कपमध्ये नामिबियाविरुद्ध २ बाद ३११ धावा, २०१८ मध्ये आफ्रिकेविरुद्ध ६ बाद ३०३ धावा भारताने केल्या होत्या. आज २००३च्या वर्ल्ड कपमधील श्रीलंकेविरद्ध ६ बाद २९२ धावांचा विक्रम मोडला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासंजू सॅमसनतिलक वर्मा