IND vs SA T20: टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेचे 'हे' ५ खेळाडू ठरू शकतात डोकेदुखी

उद्यापासून भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेला होणार सुरूवात

5 Dangerous South Africa players: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची T20 मालिका उद्यापासून सुरू होत आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या या ५ धोकादायक खेळाडूंपासून टीम इंडियाला सांभाळून राहावे लागणार आहे.

डेव्हिड मिलर- T20 मधील धोकादायक फलंदाज डेव्हिड मिलरने IPL आणि T20 क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. मिलरने दक्षिण आफ्रिकेसाठी 114 टी-20 सामन्यांमध्ये 2 शतके आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 2216 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 121 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 12 अर्धशतकांसह 2714 धावा केल्या.

हेनरिक क्लासेन- दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेनने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. क्लासेन त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो मॅचफिनिशर म्हणून येतो आणि दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वपूर्ण धावा करतो. क्लासेन टीम इंडियालाही अडचणीत आणू शकतो.

एडन मार्कराम- दक्षिण आफ्रिकेचा झंझावाती फलंदाज आणि कर्णधार एडन मार्करामही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड कपमध्येही त्याची बॅट खूप चालली. विश्वचषकात त्याने 10 सामन्यात 45 च्या सरासरीने 406 धावा केल्या. तो भारतीय संघाविरुद्ध घरच्या मैदानावरही दमदार कामगिरी करू शकतो.

जेराल्ड कोएत्झी- दक्षिण आफ्रिकेचा युवा आणि वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने विश्वचषक शानदार गाजवला. त्याने केवळ 8 सामन्यात 20 विकेट घेतल्या. T20 इंटरनॅशनलमध्ये कोएत्झीची कामगिरी इतकी खास नव्हती. मात्र तो ज्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे तो या मालिकेत भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

केशव महाराज- T20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजही भारतासाठी मोठा धोका बनू शकतो. त्याच्या फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरते हे दिसून आले आहे. केशव फलंदाजीतही चांगला तग धरू शकतो. केशव महाराजने विश्वचषकातही 10 सामन्यांत 15 विकेट घेतल्या होत्या.