ind vs sl 1st odi :विराटची तुलना सचिनशी करू नका, तेव्हा धावा करणं खूप अवघड होतं - गौतम गंभीर

आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जोरदार शकत ठोकले. श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत विराटने शतक ठोकले. विराटने या सामन्यात सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला.

आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जोरदार शकत ठोकले. श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत विराटने शतक ठोकले. विराटने या सामन्यात सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. विराटने ८७ चेंडूत १२ चौकार आमि १ षटकार ठोकत ११३ धावा केल्या. यावर आता माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराटची तुलना सचिनशी होऊ शकत नाही असं म्हटले आहे. सचिनच्या काळात खेळपट्टीवर धावा करणे खूप अवघड होते, असं गौतम गंभीरने म्हटले आहे.

'सचिन तेंडुलकरच्या काळात सर्कलच्या बाहेर पाच खेळाडू असायचे. आता क्रिकेटमधील नियम बदलले आहेत, सर्कलच्या आत पाच खेळाडू असतात. त्या काळाचत फलंदाजाला खेळणे अवघड असायचे आता फलंदाजाला खेळणे सोपे आहे.

आताच्या खेळपट्टीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता सर्कलच्या आत पाच खेळाडू असतात त्यामुळे खेळाडूला फटके मारणे सोपे असते, अस गौतमचे मत आहे.

शुभमन आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. Umpire Call ने रोहित व शुभमन या दोघांनाही जीवदान दिले. २०व्या दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला.

शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला अन् रोहितसोबत त्याची १४३ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. रोहितची फटकेबाजी सुरूच होती, परंतु २४व्या षटकात दिलशान मदूशंकाने ही वाटचाल रोखली. रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. बॅटची किनार घेत चेंडू यष्टींवर आदळला.

विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी धावांचा वेग कायम राखला होता, परंतु धनंजया डि सिल्वाने सापळा रचला. अय्यर २८ धावांवर झेलबाद झाला. विराटने वन डे क्रिकेटमधील ६५ वे अर्धशतक षटकार खेचून पूर्ण केले.

श्रीलंकेच्या यष्टिरक्षकाने विराटचा सोपा झेल टाकला. त्यानंतर विराट सुसाट सुटला अन् लोकेश राहुलसह ७० चेंडूंत ९० धावा चोपल्या. लोकेश २९ चेंडूंत ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला. विराट काही श्रीलंकेच्या गोलंदाजांना बदणारा नव्हता, त्यात त्यांनी भारताच्या स्टार फलंदाजाला दोन जीवदान दिले. हार्दिक माज्ञ १४ धावा करून माघारी परतला.

सर्वांना विराटच्या ७३व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा लागली होती आणि त्यामुळे त्याच्या प्रत्येक धावेवर स्टेडियमवर जल्लोष होताना दिसला. विराटने ८० चेंडूंत शतक पूर्ण केले. मायदेशातील हे त्याचे २०वे शतक ठरले अन् त्याने सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली.

श्रीलंकेविरुद्ध विराटचे हे ९ वे शतक ठरले अन् त्याने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये ४५ शतकांसाठी ४२४ इनिंग्ज खेळल्या, विराटने २५७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. भारताने ७ बाद ३७३ धावांचा डोंगर उभा केला.