Join us  

IND vs SL, 1st Test Day 2 Live Updates : Ravindra Jadejaने १९८६ सालचा कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला; भारताने धावांचा डोंगर उभारला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 1:45 PM

Open in App
1 / 9

पहिल्या दिवशी रिषभच्या नेत्रदिपक कामगिरीनंतर दुसरा दिवस रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) नावावर राहिला. त्याने आणि आर अश्विनने १३० धावांची भागीदारी केली. अश्विन बाद झाल्यानंतर जडेजाने खिंड लढवताना भारताला पाचशे पार पल्ला गाठून दिला. रवींद्र जडेजाने आज दमदार खेळ करताना कपिल देव यांचा १९८६ सालचा विक्रम मोडला

2 / 9

रोहित व मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी हनुमा विहारीसह १५५ चेंडूंत ९० धावा जोडल्या. विराट ४५ धावांवर, तर विहारी ५८ धावांवर बाद झाला. त्यानंतर रिषभ पंतने व श्रेयस अय्यरसह ८८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली.

3 / 9

श्रेयस २७ धावांवर LBW झाला. रिषभ ९७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावांवर माघारी पतला आणि जडेजासह त्याची १०४ ( ११८ चेंडू) धावांची भागीदारीही संपुष्टात आली. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावताना आर अश्विनसह ७व्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. जडेजा व अश्विन ही सेट झालेली जोडी श्रीलंकेसाठी डोकेदुखी ठरली होती. त्यांनी सातव्या विकेटसाठी १३० धावा जोडून संघाला ४५0+ पार पल्ला गाठून दिला. पण, लकमलने ही भागीदारी संपुष्टात आली.

4 / 9

त्याने टाकलेल्या पहिल्या बाऊन्सरवर अश्विनने चौकार खेचला, परंतु लकमने पुन्हा तसाच चेंडू टाकला आणि यावेळेस अश्विन फसला. चेंडू बॅटची किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. अश्विन ८२ चेंडूंत ८ चौकारांसह ६१ धावांवर बाद झाला. जडेजाने १६६ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. कसोटीतील त्याचे हे दुसरे शतक ठरले.

5 / 9

कसोटी क्रिकेटमध्ये ७व्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला. याआधी कपिल देव यांनी १९८६मध्ये कानपूर कसोटीत १६३ धावा, महेंद्रसिंग धोनीने २००९ साली अहमदाबाद व मुंबई येथे अनुक्रमे ११० व १००* धावा केल्या होत्या.

6 / 9

जडेजाने फटकेबाजी कायम राखताना भारताला पाचशेपार पल्ला गाठून दिला. मागील २०+ कसोटीत प्रथमच भारताने डावात ५००+ धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताने ११ वेळा पाचशेपार धावा केल्या आहेत. जडेजाने ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसोबत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना वैयक्तिक दीडशे धावाही पूर्ण केल्या. या दोघांच्या ५६ चेंडूंत ५४ धावांच्या भागीदारीत शमीचे योगदान हे शून्य धावांचे होते.

7 / 9

रवींद्र जडेजाने १६८ धावांचा टप्पा ओलांडताच त्याने कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला. भारताकडून ७ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावरील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. कपिल देव यांनी १९८६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १६३ धावा केल्या होत्या.

8 / 9

कसोटी क्रिकेटमध्ये २००+ विकेट्स व १५० + धावा करणारे दोनच खेळाडू आहेत आणि ते म्हणजे कपिल देव व रवींद्र जडेजा. सर जडेजाने ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली.

9 / 9

भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारवींद्र जडेजाकपिल देवरिषभ पंतआर अश्विनमोहम्मद शामी
Open in App