Join us  

IND vs SL, 1st Test Live Updates : Hanuma Vihari चा मौके पै चौका!; अर्धशतक झळकावताच व्हायरल झाली 'ही' तरुणी, पाहा कोण आहे ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 1:32 PM

Open in App
1 / 12

India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार म्हणून प्रथमच मैदानावर उतरला आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंच्या जागी संघात हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली.

2 / 12

रोहित व मयांक अग्रवाल यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी ९ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. पण, लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर रोहित फसला अन् १०व्या षटकात २९ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर मयांक व हनुमा विहारीने डाव सावरला, परंतु लसिथ इम्बुल्डेनियाने १९व्या षटकात भारताला दुसरा धक्का दिला. मयांक ३३ धावांवर LBW झाला.

3 / 12

त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli) मैदानावर आला अन् मोहाली स्टेडियम त्याच्या नावाने दणाणून निघाले. विराट... विराट... विराट... हा जयघोष झाला. विराटनेही तिसऱ्या विकेटसाठी विहारीसह अर्धशतकी भागीदारी करून भारताला मजबूत आघाडीच्या दिशेने कूच करून दिली आहे.

4 / 12

हनुमाने मिळालेल्या संधीचं सोन करताना ९३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. कसोटीतील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. अजिंक्य व पुजारा यांच्या उपस्थितीत हनुमाला फार कमी संधी मिळाली, परंतु आता त्यांच्या गैरहजेरीत मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं करायचं ठरवलंय.

5 / 12

दरम्यान, हनुमाने अर्धशतक झळकावताच कॅमेरामनने एका सुंदर तरुणीला त्यांच्या कॅमेरात कैद केले. ही तरुणी म्हणजे हनुमाची पत्नी प्रिती आहे.

6 / 12

प्रिती राज ही पेशाने फॅशन डिझायनर आहे आणि २०११मध्ये एका कॉमन मित्राच्या माध्यमातून हनुमा व प्रितीची भेट झाली होती.

7 / 12

त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी होत राहिल्या. सुरुवातीला प्रितीला हनुमा हा गंभीर स्वरूपाचा व्यक्ती वाटला, परंतु जसजशा भेटी वाढत गेल्या तसतसा खरा हनुमा तिला समजला.

8 / 12

प्रितीला डिनरला घेऊन गेल्यानंतर हनुमाने तिला रिंग देऊन प्रपोज केले आणि तिनेही लगेच होकार दिला. १९ मे २०१९मध्ये या दोघांनी लग्न केले.

9 / 12

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App