IND vs SL, 1st Test : R Jadeja ने १८९७साली ७व्या क्रमांकावर येऊन केलेल्या १७५ धावा; डोक्याला झिणझिण्या आणेल ही आकडेवारी

India vs Sri Lanka, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवताना ८ बाद ५७४ धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेचे दुसऱ्या दिवसअखेर ४ फलंदाज १०८ धावांवर माघारी परतले आहेत. श्रीलंका अजूनही ४६६ धावांनी पिछाडीवर आहे. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) हा आजच्या सामन्यातील नायक ठरला.

India vs Sri Lanka, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवताना ८ बाद ५७४ धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेचे दुसऱ्या दिवसअखेर ४ फलंदाज १०८ धावांवर माघारी परतले आहेत. श्रीलंका अजूनही ४६६ धावांनी पिछाडीवर आहे. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) हा आजच्या सामन्यातील नायक ठरला.

मोहालीतील कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी भारताने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ५१६ धावा केल्या होत्या. त्याआधी १९९७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९ बाद ५१५ ( डाव घोषित), १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३ बाद ५०५ ( डाव घोषित) आणि २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४९९ धावा केल्या होत्या.

रिषभ पंत, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांच्या प्रत्येकासोबत जडेजाने अनुक्रमे १०४, १३० व १०३* धावांची भागीदारी केली. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.

कपिल देव यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० + धावा आणि ४००+ विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा हा दुसरा भारतीय ठरला. जडेजाने कसोटीत २१९५ धावा व २३२ विकेट्स, वन डेत २४११ धावा व १८८ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त ३२६ धावा व २८ विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देव यांनी १३१ कसोटीत ५२४८ धावा व ४३४ विकेट्स आणि २२५ वन डेत ३७८३ धावा व २५३ विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटीत ७व्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला. याआधी कपिल देव यांनी १९८६मध्ये कानपूर कसोटीत १६३ धावा, महेंद्रसिंग धोनीने २००९ साली अहमदाबाद व मुंबई येथे अनुक्रमे ११० व १००* धावा केल्या होत्या.

रवींद्र जडेजाने १७५ धावा करून कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला. भारताकडून ७ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावरील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. कपिल देव यांनी १९८६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १६३ धावा केल्या होत्या.

१३ ते १७ डिसेंबर, १८९७ या कालावधीत झालेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( England vs Australia) यांच्यातल्या कसोटी सामन्यात R Jadeja ने ७व्या क्रमांकावर खेळताना २२३ चेंडूंत २६ चौकारांच्या मदतीने १७५ धावा केल्या होत्या. होय हे खरं आहे...

इंग्लंडने पहिल्या डावात ५५१ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २३७ धावांवर गुंडाळून फॉलोऑन दिला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४०८ धावा केल्या. इंग्लंडने ९६ धावांचे लक्ष्य ९ विकेट्स राखून सहज पार केले.

या सामन्यात पहिल्या डावात R Jadeja ने १७५ धावा केल्या आणि पण, स्कोअरशीटवर त्यांचे नाव के एस रंजितसिंहजी ( Kumar Shri Ranjitsinhji) असे लिहिलेले दिसले. पण, त्यांचं खरं नाव हे R Jadeja आहे.

रंजितसिंहजी जडेजा असे त्यांचे खरे नाव आहे. १० सप्टेंबर १८७२ सालचा त्यांचा जन्म. नवानगर येथली काथिआवार प्रांतातील यदूवंशी राजपूत घराण्यातील त्यांचा जन्म. १९०७ ते १९३३ या कालावधीत रंजितसिंहजी हे नवानगरचे राजे होते. इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते आणि ते Cambridge University व Sussex कडूनही खेळले होते.

१९३५ साली भारतात प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आणि रंजितसिंहजी यांच्या नावाने रणजी करंडक स्पर्धा खेळवण्याचा निर्णय पटियालाचे महाराज भुपिंदर सिंग यांनी घेतला.