IND vs SL, 2nd Test Live Updates : Jasprit Bumrah ची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी; वेंकटेश प्रसाद, जहीर खान यांच्यावरही पडला भारी

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पाच विकेट्स घेत भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला.

India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पाच विकेट्स घेत भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाहुण्यांचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. श्रेयस अय्यरच्या ९२ धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या होत्या, परंतु आता पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीसह टीम इंडिया पुन्हा मैदानावर उतरली आहे.

जसप्रीतने २९ कसोटीत ८वेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम करून महान गोलंदाज कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. बुमराहने २४ धावांत पाच विकेट्स घेतल्या. पहिल्या २९ कसोटींत सर्वाधिक ८ वेळा डावात पाच विकेट्स घेण्याच्या कपिल देव यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.

जसप्रीतची २४ धावांत ५ विकेट्स ही श्रीलंकेविरुद्ध भारतीय गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. इशांत शर्माने २०१५ मध्ये ( ५-५४), वेंकटेश प्रसादने २००१मध्ये ( ५-७२) आणि झहीर खानने २००९मध्ये ( ५-७२) डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. जसप्रीतची भारतातील ही पहिलीच डावात पाच बळी टिपण्याची वेळ आहे.

श्रीलंकेच्या १०९ धावा या भारताविरुद्धची दुसरी निचांक खेळी ठरली. १९९०मध्ये चंडीगढ कसोटीत लंकेचा डाव ८२ धावांवर गडगडला होता. त्यानंतर १९९४मध्ये अहमदाबाद कसोटीत ११९ धावा आणि २०१५ मध्ये कोलंबो कसोटीत १३४ धावा अशी कामगिरी झाली होती.

पहिल्या ५५ कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जसप्रीतने १२० विकेट्सह दुसरे स्थान पटकावले आहे. कपिल देव १२४ विकेट्ससह अव्वल स्थानी आहेत. त्यानंतर जावगल श्रीनाथ ( १०३), इरफान पठाण ( १००) आणि मोहम्मद शमी ( १००) यांचा क्रमांक येतो.

२०१८नंतर कसोटी डावात सर्वाधिक ८ वेळा पाच बळी घेणारे दोनच गोलंदाज आहेत आणि ते म्हणजे जसप्रीत व टीम साऊदी. त्यानंतर जेसन होल्डरने ७वेळा, जेम्स अँडरसन व हसन अली यांनी प्रत्येकी ६ वेळा अशी कामगिरी केली आहे.

जसप्रीत बुमराहची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी - ६-२७ वि. वेस्ट इंडिज (२०१९), ६-३३ वि. ऑस्ट्रेलिया ( २०१८), ५-७ वि. वेस्ट इंडिज ( २०१९), ५-२४ वि. श्रीलंका ( २०२२) आमि ५-४२ वि. दक्षिण आफ्रिका ( २०२२)

भारताकडून कसोटीच्या डावात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणाऱ्या यादीत कपिल देव ( २३), झहीर खान ( ११) ,इशांत शर्मा ( ११) , जावगल श्रीनाथ ( १०) हे जसप्रीतच्या ( ८) पुढे आहेत. इरफान पठाण व वेंकटेश प्रसाद यांनी प्रत्येकी ७ वेळा अशी कामगिरी केली आहे.