IND vs SL: पंत संघात परतणार, एका नव्या खेळाडू पदार्पणाची संधी मिळणार? Rohit Sharma संघात ३ मोठे बदल करणार

IND vs SL 3rd ODI, Team India, Predicted Playing XI: गेल्या २७ वर्षात एकदाही भारत श्रीलंकेशी वनडे मालिका हरलेला नाही

IND vs SL 3rd ODI, Team India, Predicted Playing XI: भारतीय संघ यजमान श्रीलंकेविरूद्ध आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंका १-० ने आघाडीवर आहे.

पहिला सामना बरोबरीत सोडवल्यानंतर यजमान श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात भारतावर विजय मिळवला. २४१ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी निराशा केली.

भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात रोहित शर्मा-गौतम गंभीर जोडी भारतीय संघात ३ महत्त्वाचे बदल करु शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारताची मधल्या फळीतील फलंदाजी कमकुवत ठरताना दिसतेय. त्यामुळे संघात ऋषभ पंतचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. अशा वेळी केएल राहुल किंवा श्रेयस अय्यर संघाबाहेर होऊ शकतो.

स्पिनर्ससाठी फायदेशीर असलेल्या खेळपट्टीवर शिवम दुबेला संघातून वगळले जाऊ शकते. टी२० मालिकेत फिरकीची जादु दाखवणाऱ्या रियान परागला संघात स्थान मिळू शकते.

अर्शदीप सिंगला आजच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी मध्यमगती गोलंदाजीसह आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम असलेल्या हार्षित राणाला पदार्पणाची संधी मिळू शकते.