Join us  

IND vs SL 3rd T20, Playing XI: शेवटच्या सामन्यात Team India करू शकते 'हे' ३ बदल, मालिका जिंकण्यासाठी Hardik Pandya मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 4:15 PM

Open in App
1 / 6

IND vs SL 3rd T20, Team India Predicted Playing XI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिका अतिशय रंगतदार अवस्थेत आहे. पहिल्या सामन्यात भारताने २ धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने १६ धावांनी बाजी मारली. त्यामुळे मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे.

2 / 6

अशा परिस्थितीत भारताच्या संघाला मायदेशात श्रीलंकेविरूद्ध सामना जिंकण्यासाठी संघात काही बदल करावे लागतील अशी भावना चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

3 / 6

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल हे भारताचे टॉप-३ संघात नसल्याने सलामीची फळी अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने हार्दिकला एक बदल करण्याची गरज वाटू शकते. त्याशिवाय, गोलंदाजीतही दोन बदल होण्याची शक्यता आहे. पाहूया कोणत्या ३ बदलांची सुरू आहे चर्चा-

4 / 6

पहिला बदल- सलामीवीराच्या भूमिकेत सध्या इशान किशन आणि शुबमन गिल (Shubman Gill) हे दोघे दिसत आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता शुबमन गिलच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघत नाहीयेत. अशा वेळी शुबमन गिलच्या जागी संघात ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

5 / 6

दुसरा बदल- अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) संघात असूनही त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला हवा तसा होत नसल्याचे दिसत आहे. श्रीलंकेच्या फलंदाजांच्या फटेकबाजीपुढे त्याची गोलंदाजीही निष्प्रभ ठरत असल्याने त्याच्या जागी संघात वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) संधी मिळू शकते. त्याच्या माध्यमातून एक अष्टपैलू खेळाडूचा संघात समावेश करता येऊ शकेल.

6 / 6

तिसरा बदल- दुसऱ्या सामन्याच्या निकालात मोठी भूमिका बजावणारा अर्शदीप सिंग टीकेचा धनी ठरला. त्याच्या ५ नो-बॉलची चर्चा दूरवर पोहोचली. त्यामुळे त्याला संघातून बाहेर बसवून त्याच्या जागी हर्षल पटेलला पुन्हा संधी दिली जाऊ शकते. पण हर्षल पटेल पहिल्या सामन्यात महाग पडल्याने मुकेश कुमारला पुनरागमनाची संधी मिळू शकते.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाहार्दिक पांड्याअर्शदीप सिंगशुभमन गिलयुजवेंद्र चहल
Open in App