Join us  

IND vs SL :'अंडरग्राऊंड होण्याची वेळ आली...' श्रीलंकेविरुद्ध संजू सॅमसन फेल झाल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 1:54 PM

Open in App
1 / 9

India vs Sri Lanka : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा २ धावांनी पराभव केला. मात्र, या विजयानंतरही टीम इंडियाच्या संजू सॅमसनला ट्रोल केले जात आहे. संजू सॅमसनला पहिल्या सामन्यात स्थान देण्यात आले होते, परंतु त्याला केवळ ५ धावा करता आल्या आणि संजूने एक सोपा झेल सोडला. यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. नेटीझन्सच्या भन्नाट मीम्स व्हायरल झाल्या आहेत.

2 / 9

श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरीही करून दाखवली. पदार्पणवीर शुभमन गिल ( ७), सूर्यकुमार यादव ( ७) व संजू सॅमसन ( ५) हे माघारी परतले.

3 / 9

इशान किशनने कर्णधार हार्दिक पांड्यासह त्याने ३१ धावांची भागीदारी केली. पण, तो ३७ धावांवर ( ३ चौकार व २ षटकार) माघारी जावे लागले. हार्दिक २९ धावांवर यष्टीरक्षकाच्या हाती तो झेल देऊन माघारी परतला.

4 / 9

दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अखेरच्या पाच षटकांत फटकेबाजी केली. अक्षरने २० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या, तर दीपकने २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या. या दोघांनी ३५ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली आणि भारताने ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली.

5 / 9

प्रत्युतरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ १६० धावांत माघारी परतला. पदार्पणवीर शिवम मावीने २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या ट्वेंटी-२० सामन्यात चार विकेट्स घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला.

6 / 9

श्रीलंकेच्या कुसल मेंडिस ( २८), कर्णधार दासून शनाका ( ४५), वनिंदू हसरंगा ( २१) व चमिका करुणारत्ने ( २३*) यांनी सुरेख खेळ केला, परंतु २ धावांनी त्यांना हार मानावी लागली.

7 / 9

8 / 9

रिषभ पंतच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी दिली गेली, परंतु तो अपयशी ठरल्याने चाहते खवळले. संजूला संधी मिळत नसल्याची चर्चा अनेकदा रंगली. पण आता संधी मिळूनही तो अपयशी ठरल्याने नेटीझन्सनी त्याला ट्रोल केले.

9 / 9

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाऑफ द फिल्डसंजू सॅमसन
Open in App