Join us

IND vs SL ODI Series : हार्दिक उपकर्णधार, सूर्या मिस्टर परफेक्शनिस्ट; वनडे सीरीजमध्ये दिसणार 'हे' बदल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:28 IST

Open in App
1 / 7

IND vs SL ODI Series : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला मंगळवारपासून (10 जानेवारी) सुरुवात होत आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह चांगलाच वाढला आहे. एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा भारताचे कर्णधारपद सांभाळणार आहे. अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे रोहित गेल्या काही सामन्यांमधून बाहेर होता. पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता गुवाहाटी येथे खेळवला जाईल.

2 / 7

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेद्वारे भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 ची तयारी करत आहे. या मालिकेत काही सीनिअर खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. त्यांची विश्वचषक संघात निवड केली जाऊ शकते. तसेच, भारतीय चाहत्यांना एकदिवसीय मालिकेत काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील.

3 / 7

हार्दिक पांड्या उपकर्णधार: हार्दिक पांड्या वनडे मालिकेत उपकर्णधार असणार आहे. हार्दिकला पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी मिळाली आहे. हार्दिकच्या आधी केएल राहुल ही जबाबदारी सांभाळत होता, पण खराब फॉर्ममुळे त्याला उपकर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. हार्दिकने अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्या बऱ्याच कालावधीनंतर एकदिवसीय सामना खेळणार आहे. हार्दिकने मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर वनडे सामना खेळला होता.

4 / 7

नवीन सलामीची जोडी: या एकदिवसीय मालिकेत शुभमन गिल कर्णधार रोहित शर्मासह भारतासाठी सलामी करताना दिसणार आहे. शिखर धवन रोहित शर्मासोबत ओपनिंगची जबाबदारी सांभाळायचा, मात्र त्याला या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत संधी मिळालेली नाही. शुभमन गिलला या मालिकेद्वारे विश्वचषकातील आपला दावा आणखी मजबूत करण्यची संधी आहे.

5 / 7

सूर्यकुमारची नवीन शैली: सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत आहे, परंतु त्याला अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करता आलेलं नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्याला 16 सामन्यात 32 च्या सरासरीने केवळ 384 धावा करता आल्या आहेत. अशा स्थितीत तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्यासाठी उत्सुक असेल.

6 / 7

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन (उपकर्णधार). यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

7 / 7

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक: 10 जानेवारी - पहिला वनडे, गुवाहाटी, दुपारी 1.30 वा, 12 जानेवारी - दुसरी वनडे, कोलकाता, दुपारी 1.30 वा, 15 जानेवारी - तिसरा एकदिवसीय, तिरुवनंतपुरम, दुपारी 1.30 वा.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतश्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्या
Open in App